- Advertisement -

आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात विदेशी खेळाडूंचाच जलवा, सर्वांत महाग विकल्या गेले हे 5 विदेशी खेळाडू… 5 जणांसाठी फेन्चायझीने मोजलेत तब्बल एवढे कोटी..

0 0

आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात विदेशी खेळाडूंचाच जलवा, सर्वांत महाग विकल्या गेले हे 5 विदेशी खेळाडू… 5 जणांसाठी फेन्चायझीने मोजलेत तब्बल एवढे कोटी..


आयपीएल 2023च्या मिनी ऑक्शनला आज सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी अनेक खेळाडूंवर बोली लावली गेली. ज्यात प्रामुख्याने युवा खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी सर्वच फेन्चायजी वाटेल तेवढी किंमत मोजायला तयार असल्याचे पाहायला मिळाले.

सलामीवर खेळाडू पासून सुरु झालेली ही बोली विकेटकीपर,अष्टपैलू खेळाडू नंतर गोलंदाज अशी चालत चालत समोर गेली. आणि प्रत्येक वेळेस एक नवा खेळाडू करोडपती होताना दिसला.

आयपीएल

मात्र असं असले तरीही सध्याच्या या लिलावामध्ये सर्वांत जास्त जलवा दिसला तो म्हणजे विदेश युवा खेळाडूंचा. भारतीय संघाचे जवळपास सर्वच प्रसिद्ध खेळाडू हे आधीच आपापल्या संघाने करारबद्ध केले असल्यामुळे मोठी बोली लागली जावी असा एकही भारतीय खेळाडू या लिलावात सहभागी झाला नव्हता. मात्र विदेशी युवा खेळाडूंची मोठी यादीच या लिलावात सहभाग होती.

ज्याचाच परिणाम म्हणून आज झालेल्या लिलावात सर्वांत महागडे ठरलेले जवळपास सर्वच  खेळाडू हे विदेशी आहेत. 15 कोटींहून अधिक बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये सर्वच विदेशी खेळाडू आहेत. या लेखात आपण जाणून घेऊया त्या 5 खेळाडूबद्दल ज्यांच्यावर सर्वांत जास्त बोली लागली आहे.

सॅम करण: सलामीवर फलंदाजांवर बोली लावून झाल्यानंतर 5 अष्टपैलू खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. ज्यात सॅम करणचे नाव वर आले. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सचा हिस्सा असलेल्या करण यावर्षी चेन्नईने रिलीज केल्यामुळे या लिलावाचा  हिस्सा बनला होता. त्याचे नाव उच्चारताच जवळपास सर्वच संघांमध्ये त्याच्यासाठी बोली लावण्याची स्पर्धा सुरु झाली. शेवटपर्यंत चाललेल्या या लढाईमध्ये  पंजाब आणि मुंबई दोघानी शेवटपर्यंत लढाई केली.

मात्र पंजाब किंग्सने ही स्पर्धा जिंकली आणि त्याला  तब्बल 18.50 कोटी रुपये मोजून संघात दाखल करून घेतले .

केमरोन ग्रीन: ऑस्ट्रोलीयाचा अष्टपैलू खेळाडू केमरोन ग्रीन. त्याचे नाव पुकारताच सर्वच फ्रेन्चायजी बोली लावण्यासाठी सरसावले. त्याने मागील काही दिवसामध्ये आपल्या खेळाने सर्वच क्रिकेटप्रेमींना आकर्षित केले होते.

गोलंदाजी असो की फलंदाजी दोन्ही मधेही हा युवा खेळाडू जबरदस्त परफोर्म  करतोय. म्हणूनच आयपीएल मिनी लिलाव सुरु होण्याआधीच त्याच्यावर मोठी बोली लागणार असल्याची चर्चा क्रिकेटक्षेत्रात होती. त्याच्यावरमोठी बोली लावून मुंबई इंडियन्सने त्याला संघात दाखल करून घेतले आहेत. त्यासाठी मुंबईने तब्बल 17.50 कोटी मोजले. आयपीएलच्या या लिलावातील तो दोन नंबरचा महागडा खेळाडू ठरलाय.

बेन स्टोक्स: इंग्लंड संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा जबरदस्त फफोर्ममध्ये असलेला खेळाडू आहे,. वर्ल्डकपमधील त्याची कामगिरी पाहून आगोदरच सर्व फ्रेन्चायझी त्याच्यावर खुश झाल्या होत्या. त्याच्यावर मोठी बोली लागली जाणार हे जवळपास निच्चीत होते. चेन्नई संघाने त्याला तब्बल 16.25 करोड रुपये देऊन खरेदी केले आहे.

चेन्नईची ही या लिलावातील पहिलीच खरेदी ठरली. ब्रावोची रिप्लेसमेंट म्हणून चेन्नईने बेन स्टोक्सवर दाव खेळला आहे. आता तो कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

निकोलस पूरन: वेस्ट इंडीज संघाचा युवा कर्णधार निकोलस पूरन हा सुद्धा या लिलावात सहभागी झाला होता. त्याला लखनौ संघाने तब्बल 16 कोटी मोजून आपल्या संघात दाखल केले.

 हैरी ब्रूक्स : तर दुसऱ्या नंबरवर बोली लागलेला खेळाडू हैरी ब्रूक्स  वर 13 करोड 25 लाखांची बोली लावून सनरायजजर्सने आपल्या संघात दाखल करून घेतले आहे. इंग्लंडच्या या युवा खेळाडूने आपल्या कौशल्याने सर्वांनाच चकित केले होते. त्यामुळे जवळपास सर्वच संघ त्याच्यावर बोली लावण्यास उत्सुक होते.


हेही वाचा:

18 चौकार, 2कडक षटकार… टीम इंडियात मिळत नाही संधी म्हणून, अजिंक्य रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये दाखवली आपली ताकत. गोलंदाजांना फोडून काढत शतक ठोकलेच शिवाय नावावर केले हे मोठे विक्रम..

आयपीएलमध्ये आतापर्यंत या 5 खेळाडूंनी ठोकलेत सर्वांत जास्त षटकार, एकं तर षटकार ठोकून सामना जिंकवून देण्यास आहे माहीर..

“मला आशा होती की कमीत कमी आता तरी” बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतसुद्धा जागा न मिळाल्यामुळे नाराज झाला हा स्टार खेळाडू, सोशल मिडियावर जगजाहीर केली आपली नाराजी..!

 

Leave A Reply

Your email address will not be published.