World cup Records: विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे हे आहेत टॉप खेळाडू: पहा सर्वोत्कृष्ट खेळाडूंची यादी.

World cup Records: क्रिकेटमध्ये ‘कॅचेस विन मॅचेस’ ही म्हण खूपच प्रसिद्ध आहे. कारण एक कॅच सुटली किंवा पकडली तर, सामन्याचा निर्णय पूर्णतः बदलू शकतो. क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत अनेक सर्वोत्कृष्ट झेल क्षेत्ररक्षकांनी घेतले. एखाद्या क्षेत्ररक्षकाने जर सर्वोत्कृष्ट झेल घेतला तर त्याची दशकांनु दशके चर्चा क्रिकेट प्रेमींमध्ये होत असते.

1983 झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार कपिलदेव यांनी व्ही व्ही एन रिचर्डस यांचा घेतलेला झेल आजही क्रिकेट प्रेमींच्या मनात घर करून आहे. आज आपण विश्वचषकातल्या एका सामन्यात सर्वाधिक झेल (Most Catches in World cup match) घेतलेल्या खेळाडूंची माहिती घेणार आहोत.

World cup Records

World cup Records: या खेळाडूंनी क्रिकेटच्या एका सामन्यात घेतलेत सर्वाधिक झेल (Most Catches in World cup match)

मोहम्मद कैफ: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांचे नाव घेतले तर आपसूकच मोहम्मद कैफ याचे नाव पहिल्यादा घेतले जाते. कैफ मैदानावर उतरताना अत्यंत चपळाईने फील्डिंग करायचा. क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा दिसायची. त्याने अनेक अविश्वसनीय झेल घेतले आहेत, ज्याची चर्चा आजही होत आहे. कैफ ने 2003 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक चार झेल घेतले होते.

 सौम्य सरकार : बांगलादेशचा अत्यंत चपळ असलेला खेळाडू सौम्य सरकार याने 2015 साली विश्वचषकात स्कॉटलंड विरुद्ध खेळताना चार झेल टिपले होते. सुपरमॅनसारखे हवेत सूर मारत हे झेल पकडले होते. बांगलादेशच्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.

World cup Records: विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे हे आहेत टॉप खेळाडू: पहा सर्वोत्कृष्ट खेळाडूंची यादी.

उमर आकमल: पाकिस्तानचा खेळाडू उमर आकमल याने 2015 साली आयर्लंड विरुद्ध खेळताना सर्वाधिक चार झेल घेतले होते. विश्वचषक स्पर्धेतल्या एकाच सामन्यात सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. पक्षांसारखे हवेत सुर मारत झेल पकडण्यात हा माहीर होता.

ख्रिस वोक्स : 2019 साली ख्रिस वोक्स याने पाकिस्तान विरुद्ध खेळताना चार झेल घेत इंग्लंडला विजय मिळवून दिले होते. न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंडने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यामध्ये ख्रिस वोक्स चे खूप मोठे योगदान आहे.

World cup Records: विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे हे आहेत टॉप खेळाडू: पहा सर्वोत्कृष्ट खेळाडूंची यादी.

 जो रूट: एकाच सामन्यात सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये आता जो रूटचे नाव सामील झाले आहे. नुकत्याच अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने चार झेल टिपले आहेत. एक सर्वोत्कृष्ट फलंदाजासोबत तो एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे.

सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारत अंकतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.  तीन विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. हे तिन्ही संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहेत.