भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघात खेळताना दिसून येत नाहीये. काही दिवसांपूर्वी त्याच्या कारचा अपघात झाला होता. दिल्लीवरून आपल्या घरी जात असताना त्याच्या कारचा अपघात झाला होता. सध्या मुंबईत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्याने आपल्या कमबॅकबाबत वक्तव्य केले आहे.
रिषभ पंतने आयएएनएसला म्हटले की, ‘मी आता बरा आहे आणि मी रिकव्हर होण्याच्या प्रयत्नात आहे. आशा आहे की देवाच्या कृपेने आणि वैद्यकीय पथकाच्या पाठिंब्याने मी लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होईल. मी क्रिकेटमध्ये परत येण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही, जे मला सर्वात जास्त आवडते. मला क्रिकेटची आठवण येते कारण माझे जीवन अक्षरशः त्याच्याभोवती फिरते परंतु मी आता माझ्या पायावर परत येण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि मी क्रिकेट खेळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही, जे मला सर्वात जास्त आवडते.’

कार अपघातात रिषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आणखी महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे आगामी आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी डेव्हिड वॉर्नरला देण्यात आली आहे. तर सौरव गांगुली यांनी म्हटले होते की, रिषभ पंतला क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी कमीत कमी १ ते २ वर्षांचा अवधी लागू शकतो. मात्र रिषभ पंतला लवकरात लवकर कमबॅक करायचं आहे.
हे ही वाचा..