बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हिटमॅन करू शकतो एबी डिव्हिलियर्सचा विक्रम उध्वस्त

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हिटमॅन करू शकतो एबी डिव्हिलियर्सचा विक्रम उध्वस्त

 

एबी डिव्हिलियर्स: विश्वकपच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला भोपळा देखील पडता आला नाही. मात्र अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. भारताचा पुढचा चौथा सामना हा पुणे येथे बांगलादेश संघ विरुद्ध 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यात देखील रोहित शर्माला एक नवा विश्वविक्रम करण्याची संधी आहे.

नुकतेच रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. वेस्टइंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने 553 षटकार ठोकण्याचा विक्रम पाठीमागे टाकला. पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात खेळताना त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300पेक्षा जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला. गुरुवारी बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये षटकारांच्या बाबतीत तो आणखीन एक विक्रम करू शकतो.

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हिटमॅन करू शकतो एबी डिव्हिलियर्सचा विक्रम उध्वस्त

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स याच्या नावावर असलेला हा विक्रम रोहित शर्मा पाठीमागे टाकू शकतो. 36 वर्षीय रोहितने विश्वचषक स्पर्धेत 34 षटकार ठोकले असून ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

एबी डिव्हिलियर्स आणि विश्वचषक स्पर्धेत एकूण 37 षटकार ठोकले आहेत. विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या यादीमध्ये क्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे ज्याने उपस्थित सामन्यात 49 षटकार ठोकले आहेत. तसेच त्याने 36 च्या सरासरीने 1186 धावा देखील काढल्या आहेत. एबी डिव्हिलियर्स यांनी विश्वचषकाच्या 12 सामन्यात 63.52 च्या सरासरीने 1207 धावा कुटल्या आहेत.

world cup 2023: किती सामने जिंकल्यावर भारत पोहचू शकतो विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये: वाचा ही महत्त्वपूर्ण बातमी!

भारताला या विश्वचषक स्पर्धेत आणखीन सहा सामने खेळायचे आहेत. रोहित शर्माचा हा परफॉर्मन्स कायम राहिला तर क्रिस गेलचा देखील विक्रम उध्वस्त करू शकतो. भारत यंदाचा विश्वकप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. 2011 साली भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. भारत त्याच्याच नेतृत्वाखाली विश्वकप स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. सुरुवातीच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सारख्या दिग्गज संघाला हरवल्यामुळे भारताचे मनोबल नक्कीच वाढले आहे.

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हिटमॅन करू शकतो एबी डिव्हिलियर्सचा विक्रम उध्वस्त

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तीन विजयासह भारताचे सहा गुण झाले आहेत. सेमी फायनलपर्यंत मजल मारण्यासाठी भारतीय संघाला एकूण सात सामने जिंकायचे आहेत. भारताने यापूर्वीच तीन सामने जिंकलेत. भारताला आणखीन चार सामने जिंकण्याची गरज आहे. भारतीय संघाने सहा सामने जिंकले तरी तो टॉप 4 मध्ये येऊ शकतो. मागील विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी पाच सामने जिंकलेल्या संघदेखील सेमी फायनलमध्ये पोहोचला होता.