SA vs NZ: दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात षटकारांचा नवा विक्रम रचला आहे. पुण्यातील आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील 32 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी करत विरोधी संघासमोर मोठी धावसंख्या उभारली आणि विजयासाठी 358 धावांचे लक्ष्य ठेवले. फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 4 गडी गमावून 357 धावा केल्या.
“Qudrat ka Nizam”
Temba Bavuma after seeing Pakistan fans supporting him and his team today:#NZvsSA #ICCRankings #CWC23#BabarAzam𓃵 #ShaheenAfridi pic.twitter.com/NPIMCKv7p0
— Cricket In Blood (@CricketInBlood_) November 1, 2023
डेव्हिड मिलरने 30 चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय, हेन्रिक क्लासेन १५ धावा करून नाबाद राहिला आणि एडन मार्कराम ६ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने संपूर्ण डावात 15 षटकार ठोकले, त्यानंतर आफ्रिकन संघाने विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. पुरुषांच्या विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक षटकार मारणारा दक्षिण आफ्रिका संघ बनला आहे.
दक्षिण आफ्रिकेने चालू विश्वचषकातील 7 सामन्यांमध्ये 82 षटकार मारले आहेत, जे एका स्पर्धेत कोणत्याही संघाने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता, ज्यांनी 2019 विश्वचषकात 76 षटकार ठोकले होते. सध्याच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचे अजून २ गट सामने बाकी आहेत.
SA VS NZ: सामन्याची स्थिती
प्रथम फलंदाजी करतांना दक्षिण आफ्रिकेने डीकॉकच्या शतकाच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 4 गडी गमावू 357 धावा काढल्या. प्रत्युतराट न्यूझीलंड संघाचे 133 धावांत ९ विकेट गमावले असून जवळपास न्यूझीलंडने हा सामना जवळपास गमावला आहे.
हेही वाचा: