AFG vs IND:.. म्हणून सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघाच्या खेळाडूने 2 मिनिट मौन पाळत शोक व्यक्त केला, जाणून घ्या कारण..
काही दिवसापूर्वी अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत हजारो लोक मरण पावले, तर अनेक लोक अजूनही जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs Afg) यांच्यात दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या सामन्याआधी खेळाडूंनी जीव गमावलेल्यांना दोन मिनिट श्रद्धांजली आणि मृतांप्रती शोक व्यक्त करताना त्यांच्या स्मरणार्थ काही क्षण मौन पाळले.
वृत्तानुसार, गेल्या बुधवारी उत्तर-पश्चिम अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप जाणवला. ही नैसर्गिक आपत्ती इतकी शक्तिशाली होती की, त्याचे हादरे 10 किमी (6.21 मैल) खोलीपर्यंत जाणवले. या भीषण अपघातात दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. शिवाय हजारो लोक जखमी झाले. या दुर्घटनेत अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. हा अपघात देशातील दोन दशकांतील सर्वात विनाशकारी भूकंपांपैकी एक असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशातील या मोठ्या अपघातानंतर स्टार फिरकीपटू रशीद खानही खूप दु:खी दिसत होता. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांनी आपले दुःख व्यक्त केले. दरम्यान, 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी मिळालेली संपूर्ण फी आपण भूकंपग्रस्त लोकांना दान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय त्यांच्या मदतीसाठी मोहीमही सुरू करणार असल्याचे राशिद म्हनाला.
अष्टपैलू खेळाडूनेराशिद खानने पोस्टकरत लिहिले की,, ‘अफगाणिस्तान, हेरात, फराह आणि बादघिस या पश्चिम प्रांतात झालेल्या भूकंपाबद्दल समजल्यानंतर मला खूप दुःख झाले. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी मी विश्वचषक २०२३ साठी माझे सर्व शुल्क दान करत आहे. लवकरच निधी उभारणी मोहीमही सुरू करणार आहोत. शिवाय ज्यांना शक्य आहे त्यांनीही आपापल्या परीने पिढी तांना मदत करण्याचे आवाहन त्याने केले आहे.
PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..