IND vs NZ Semifinal: सेमीफायनल महामुकाबल्याआधी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, हे खेळाडू ठरतील टीम इंडियासाठी डोकेदुखी..

0
3

IND vs NZ  Semifinal: विश्वचषक 2023 आता जवळपास संपण्याच्या टप्यात आला आहे. येत्या 5/6 दिवसात जगाला नवा विश्वविजेता मिळणार आहे.  टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) मध्ये आतापर्यंत खेळलेले सर्व 9 सामने जिंकले आहेत. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

न्यूझीलंडने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने साखळी सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला होता. मात्र उपांत्य फेरीत कडवी स्पर्धा पाहायला मिळू शकते. या सामन्यात भारताला रचिन रवींद्र आणि ट्रेंट बोल्टपासून सावध राहावे लागणार आहे. हे दोन्ही खेळाडू धोक्याच्या घंटासारखे आहेत. रचिनने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.

IND vs NZ ODI World Cup Semifinal

World Cup 2023:  IND vs NZ  Semifinal: या खेळाडू कडून असणार टीम इंडियाला मोठा धोका.

रचिन रवींद्र: टीम इंडियाला भारतीय वंशाचा खेळाडू रचिन रवींद्र हा सर्वांत मोठा धोका असणार आहे. त्याची विकेट घेणे खूप महत्त्वाचे असेल. रचिनने 9 सामन्यात 565 धावा केल्या आहेत. त्याने शतके आणि अर्धशतकेही झळकावली आहेत. रचिनने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतके झळकावली होती. त्याने पाकिस्तानविरुद्ध १०८ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११६ धावा केल्या होत्या. त्याने भारताविरुद्ध 75 धावांची इनिंग खेळली होती. रचिन स्फोटक फलंदाजीसोबतच गोलंदाजीही उत्तम करतो. श्रीलंकेविरुद्ध त्याने 2 बळी घेतले होते. त्यामुळे भारतीय संघाला फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर रवींद्रला हलक्यात घेऊन चालणार नाही.

ट्रेंट बोल्ट: न्यूझीलंडचा दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे ‘ट्रेंट बोल्ट’ ट्रेंट बोल्टबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 9 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. बोल्टने श्रीलंकेविरुद्ध ३ बळी घेतले होते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धही ३ बळी घेतले. बोल्ट अनुभवी असून त्याने अनेक प्रसंगी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.

IND vs NZ 

न्यूझीलंडला भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्धही पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर त्याने इंग्लंड, नेदरलँड्स, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा पराभव केला. उपांत्य फेरीपूर्वी झालेल्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर ५ गडी राखून विजय मिळवला होता. आता ती टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

दोन्ही संघाची कामगिरी पाहता सेमीफायलन सामन्यात कोणता संघ कोणावर भारी पडेल हे अंदाज वर्तवणे सुद्धा अवघड आहे.


टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

 

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here