IND vs AUS 1st ODI: श्रेयस अय्यरचे दुखापतीमधून पुनरागमन तर अश्विनलाही संधी.. ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या पहिल्या ODI मध्ये या 11 खेळाडूंना मिळू शकते संधी..!

0

IND vs AUS 1st ODI: श्रेयस अय्यरचे दुखापतीमधून पुनरागमन तर अश्विनलाही संधी.. ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या पहिल्या ODI मध्ये या 11 खेळाडूंना मिळू शकते संधी..!


आशिया कप 2023 जिंकून टीम इंडियाने करोडो चाहत्यांना आणखी एक कप दिला आहे. यासोबतच आता संघासह संपूर्ण चाहत्यांचे लक्ष Worldcup 2023 वर लागले आहे. एकदिवशीय वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AU) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येतील, त्यातील पहिला सामना शुक्रवारी (22 सप्टेंबर)   बिंद्रा स्टेडियम मोहाली येथे खेळला जाईल..

भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला विश्रांती दिली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल कर्णधार (K.L. RAHUL)असेल. जानेवारी 2022 मध्ये शेवटचा सामना खेळलेल्या रविचंद्रन अश्विनचे ​​संघात पुनरागमन झाले आहे. अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे अश्विनचे ​​पुनरागमन झाले आहे.

INDvsAUS

या सामन्यात सर्वांच्या नजरा युवा खेळाडू श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) असतील. पाठीच्या दुखापतीमुळे अय्यर आशिया चषकाच्या सुपर 4 फेरी आणि अंतिम फेरीतून बाहेर पडला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अय्यर निवडीसाठी उपलब्ध असेल. भारताच्या विश्वचषक संघाचा भाग असलेल्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. आशिया कपमध्ये तो एकच सामना खेळला होता.

पाहुणा संघ ऑस्ट्रेलिया दुखापतग्रस्त खेळाडूंच्या समस्येशी झुंजत आहे. वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू मिचेल स्टार्क    दुखापतीमुळे पहिल्या वनडेमध्ये सहभागी होणार नाहीत. कर्णधार पॅट कमिन्सने याला दुजोरा दिला आहे. सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड हाताच्या दुखापतीमुळे या मालिकेतून आधीच बाहेर गेला आहे. हेडच्या जागी डेव्हिड वॉर्नर मिचेल मार्शसह डावाची सुरुवात करू शकतो.

 IND vs AUS  IND vs AUS team india squad
IND vs AUS  IND vs AUS team india squad

भारत-ऑस्ट्रेलिया वनडे रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 146 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 82 सामने जिंकले असून भारताने 54 सामने जिंकले आहेत, तर 10 सामने निकालाशिवाय संपले आहेत. भारतीय भूमीवर दोघांमध्ये 67 सामने झाले, ज्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने 32 सामने जिंकले आणि भारताने 30 सामने जिंकले आणि 4 निकालाशिवाय संपले.

IND vs AUS

असे आहेत दोन्ही संघ (Ind vs Aus Probable Playing 11)

भारत (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): इशान किशन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर/ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज/शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज/शार्दुल ठाकुर .

ऑस्ट्रेलिया (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्नस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (सी), स्पेन्सर जॉन्सन/तन्वीर संघा, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave A Reply

Your email address will not be published.