भारतीय महिला संघाने रचला इतिहास..! पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक, तीतास साधू ठरली अंतिम सामन्याची हिरो..
पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळ सामील झाला होता आणि आता भारतीय महिला संघाने आज (25 सप्टेबर) इतिहास रचला आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kour) नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या विजयाचा हिरो ठरली ती म्हणजे वेगवान गोलंदाज तीतस साधू. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला 20 षटकात 7 विकेट्सवर केवळ 116 धावा करता आल्या. मात्र असे असतानाही भारतीय गोलंदाज धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरले. विशेषत: युवा गोलंदाज तीतास साधूने जबरदस्त गोलंदाजी केली. त्यामुळे भारतीय संघ १९ धावांनी विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.

कोण आहे तीतास साधू?
तीतास साधू अंडर-19 आणि दिल्ली कॅपिटल्स महिला संघाकडून खेळली आहे तितास साधूने 4 षटकात अवघ्या 6 धावा देत श्रीलंकेच्या 3 खेळाडूंना बाद केलेआशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या तितस साधूबद्दल तुम्हाला किती माहिती आहे. तीतास साधू ‘ही’ पश्चिम बंगालच्या चिनसुराचा रहिवासी आहे. या खेळाडूचे वय फक्त 18 वर्षे आहे. उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करण्याव्यतिरिक्त, तीतास साधू ही फलंदाज देखील आहे. भारतीय वरिष्ठ महिला क्रिकेट संघापूर्वी, तीतास साधू भारताच्या अंडर-19, दिल्ली कॅपिटल्स महिला आणि भारत-अ महिला या संघांसाठी खेळली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील 2 सामन्यात 4 बळी घेतले!
त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तीतास साधू चौथ्या स्थानावर राहिला. या खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेतील 2 सामन्यात 4 बळी घेतले. विशेषतः, तीतस साधूने आपल्या विकेट घेण्याच्या क्षमतेने प्रभावित केले. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोलंदाज म्हणून तीतास साधूची सरासरी 4 होती. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपल्या शानदार गोलंदाजीनंतर तीतास साधू सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सातत्याने कमेंट करून तीतस साधूचे कौतुक करत आहेत.
हे पण वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..