IPL 2024: हार्दिक पांड्यानंतर गुजरात टायटन्सला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएल 2024 च्या संपूर्ण हंगामातून बाहेर..

0
19
ad

IPL 2024: IPL 2024 मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्व संघांनी तयारी केली आहे. गुजरात टायटन्ससाठी हे आयपीएल सर्वात वाईट ठरणार असल्याचा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. यामागे कारणही तसच आहे.  प्रथम, गुजरात टायटन्ससाठी ट्रॉफी जिंकणारा खेळाडू हार्दिक पंड्याने टायटन्स सोडून मुंबई संघात जाण्याचा निर्णय घेतला. आता आणखी एक सामना विजेता खेळाडू आयपीएल 2024 मधून बाहेर पडू शकतो. चला तर जाणून घेऊया कोण आहे  तो खेळाडू.

IPL 2024 TITLE SPONSER : टाटा आणि बिर्ला ग्रुपमध्ये मोठी टक्कर, वाचा शेवटी कुणाला मिळाले शीर्षक प्रायोजकचे अधिकार..!

आम्ही बोलत आहोत तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद  खान आहे.राशिद खानसाठी आयपीएल खेळणे कठीण दिसत आहे, जर असे झाले तर गुजरातसाठी हा मोठा धक्का असेल.

IPL 2024: काही दिवसापूर्वीच राशिद खानने पीएसएलमधून आपले नाव मागे घेतले

राशिद खानने पीएसएलमधून आपले नाव मागे घेतले आहे. राशिद पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळतो, रशीदच्या संघात असताना लाहोरने पीएसएल ट्रॉफीही जिंकली आहे. आता रशीद म्हणतो की तो पाकिस्तान सुपर लीगचा भाग होऊ शकणार नाही. अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानला संघातून वगळण्यात आल्याने लाहोरला मोठा धक्का बसला आहे. आता रशीद खान आयपीएल 2024 मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राशिद खानच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रशीद भारताविरुद्ध खेळू शकला नाही

राशिद खानच्या पाठीवर नोव्हेंबर महिन्यातच शस्त्रक्रिया झाली. या कारणास्तव, सुरुवातीला त्याला भारताविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आले होते, परंतु नंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि तो एकही टी-20 सामना खेळू शकला नाही.

रहमानउल्ला गुरबाजने राशिद खानच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानचे नेतृत्व केले. राशिद खान अजूनही बरा झालेला नाही, त्यामुळे तो खेळाडू आयपीएल 2024 मधूनही बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गुजरातच्या चाहत्यांमध्ये शांतता आहे. आधी हार्दिक पांड्या गुजरात सोडून गेला आणि आता रशीदही संघाबाहेर असू शकतो.

IPL 2024: हार्दिक पांड्यानंतर गुजरात टायटन्सला आणखी एक मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू आयपीएल 2024 च्या संपूर्ण हंगामातून बाहेर..

IPL LATEST NEWS च्या दाव्यानुसार, राशीदला हॉस्पिटलमधून 4 महिने तरी आराम करण्याचा सल्ला दिला गेला आहे. ज्यामुळे तो मे पर्यंत तरी क्रिकेटच्या मैदानात उतरेल असं दिसत नाहीये. त्यामुळे  साहजिकच पीएसएल प्रमाणेच राशीद आयपीएलमधून सुद्धा बाहेर पडू शकतो.आणि असं झाल्यास हा गुजरात साठी मोठा धक्का असणार आहे.

आयपीएल 2024 मध्ये गुजरातचे कर्णधारपद युवा सलामीवीर खेळाडू शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. अश्या वेळी त्याला राशीद खान सारख्या अनुभवी  खेळाडूंची नक्कीच आवश्यकता आहे. आता त्याच्या नेतृत्वात गुजरात या हंगामात कशी कामगिरी करते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता