World Cup Records: 2023 विश्वचषक ( Odi World Cup 2023) स्पर्धेतील सर्व सामने हे रोमांचकारी होत आहेत. प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पडत आहे. हा विश्वचषक गोलंदाजा ऐवजी फलंदाज चांगलेच गाजवत आहेत. प्रत्येक सामन्यात रोज नवनव्या विक्रमांचे मनोरे रचले जात आहेत. विश्वचषक स्पर्धेमध्ये धावांचा पाठलाग करतांना अनेक खेळाडूंनी अर्धशतके साजरी केली आहेत पण तुम्हाला माहिती आहे का? विश्वचषक स्पर्धेमध्ये लक्षाचा पाठलाग करतांना सर्वाधिक अर्धशतके कुणी ठोकली आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक अर्धशतके ठोकले आहेत.
विश्वचषकात लक्ष्यचा पाठलाग करत असताना ‘या’ खेळाडूंनी ठोकले सर्वाधिक अर्धशतके (Most Half Century In World Cup)
रोहित शर्मा (Rohit Sharma)
टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा (Rohit sharma) याने विश्वचषक स्पर्धेत लक्ष्याचा पाठलाग करत असताना सहा वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. यंदाच्या स्पर्धेत त्याची बॅग चांगलीच तळपत आहे. त्यामुळे या विक्रमाच्या यादीत तो आणखीन पुढे जाऊ शकतो. नुकतेच त्याने ऍडम गिलक्रिस्टला (Adam Gilchrist) पाठीमागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
ऍडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist)
या यादीत दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर ऍडम गिलक्रिस्ट(Adam Gilchrist). ऍडम गिलक्रिस्टने विश्वचषक स्पर्धेमध्ये लक्ष्याचा पाठलाग करत असताना पाच वेळा अर्धशतके खेळी केली होती. रोहित शर्माने नुकताच त्याचा हा विक्रम मोडीत काढला. गेल्या सोळा वर्षांपासून त्याचा हा विक्रम आबादित होता. तो सध्या समालोचकाच्या भूमिकेत दिसतोय.
जॅक कॅलीस (Jacques Kallis)
युवराज सिंग (Yuvraj Singh)
View this post on Instagram
भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने देखील त्याच्या विश्वचषकातल्या कारकीर्दीत पाच वेळा अर्धशतकी खेळ केली आहे.
ग्रॅहम गूच (Graham Gooch)
मार्टिन गुपटिल (Martin Guptill)

न्यूझीलंड संघाचा सलामीवीर मार्टिन गुपटिल(Martin Guptill) याने चार वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत तो न्यूझीलंड संघाचा भाग नाही. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्याने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अविश्वसनीय नाबाद 237 धावा केल्या. 145.39 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना, त्याने हा टप्पा गाठण्यासाठी फक्त 163 चेंडू खेळले होते या ताबडतोब खेळीमध्ये त्याने 11 षटकार आणि 24 चौकार मारले होते.
ब्रॅडन मॅक्युलम (Brendon Mccullum)
न्यूझीलंडचा माजी विकेट किपर फलंदाज ब्रॅडन मॅक्युलम याने देखील विश्वचषक स्पर्धेमध्ये धावांचा पाठलाग करतांना आतापर्यंत चार वेळा अर्धशतकिय खेळी केली होती. ब्रॅडन क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर सध्या इंग्लंडच्या संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.
सचिन तेंडुलकर (Sachin Tandulkar)
या यादीमध्ये शेवटचा खेळाडू आहे तो म्हणजे क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडूलकर (Sachin Tandulkar).भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील या यादीमध्ये आपले स्थान मिळवलय. त्याने देखील चार वेळा अर्धशतकीय खेळ केली होती. सचिनने त्याच्या कारकिर्दीत सहा विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..