एका सामन्यात पाच किंवा अधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज: शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला यामध्ये कर्णधार रोहित शर्मा याने 63 चेंडूत 86 धावांची आक्रमक खेळी केली. यात सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. या सामन्यात ए क मोठा विक्रम कर्णधार रोहित शर्माने आपल्या नावे केला आहे तो म्हणजे एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकण्याचा पराक्रम रोहित शर्माने तीनदा केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्मा आधी या खेळाडूंनी ठोकलेत एकाच सामन्यात 5 पेक्षा अधिक षटकार..
सचिन तेंडुलकर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम दोनदा केला आहे. एका सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या खेळाडूंचे यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. नुकताच रोहित शर्मा ने त्याचा विक्रम मोडीत काढला.
सौरव गांगुली: माजी कर्णधार सौरव गांगुलीने एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम दोनदा केला आहे. सचिन तेंडुलकर सोबत तो या यादीत अनुक्रमे दुसऱ्या स्थानी आहे.
वीरेंद्र सेहवाग: ‘मुल्तानचा सुलतान’ या नावाने ओळखला जाणारा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पराक्रम एकदा केला आहे. 2011 साली भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत वीरेंद्र सेहवागने हा कारनामा केला. एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याच्या तो चौथ्या स्थानावर आहे
या दोन्हीही खेळाडूंनी त्यांच्या कारकीर्दीत एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याचा पराक्रम प्रत्येकी एक-एक वेळा केला आहे.
शिखर धवन : ‘गब्बर’ या नावाने ओळखला जाणारा सलामीवीर शिखर धवन याने एका सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याचा पराक्रम एकदा केला आहे. सध्या तो खराब फॉर्मत असल्याने संघाबाहेर आहे. या अनोख्या विक्रमाच्या यादीत तो सहाव्या स्थानावर आहे.
युवराज सिंग: ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याने एकाच सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम त्याच्या कारकिर्दीत एकदाच केला आहे. हा मॅच विनर खेळाडू या यादीमध्ये शिखर धवन सोबत अनुक्रमे सहाव्या स्थानावर आहे.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..