आयपीएल संघांना लाजा वाटल्या पाहिजे..! सर्वांत महागड्या खेळाडूमध्ये फक्त एक भारतीय; रोहित-धोनी, कोहली, बुमराही पत्तीकम चाय..

0
3

आयपीएल : IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर (मंगळवार) रोजी झाला. त्यानंतर सर्वच संघातील खेळाडूंचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. आता स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. यावेळी लीगमध्ये खेळणारे पाच सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आयपीएल चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल.

तुम्हालाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून कोणते खेळाडू आहेत ज्यांनी या हंगामात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंविषयी सांगणार आहोत. पुढील सीझन मार्च ते मे 2024 दरम्यान खेळवला जाणार आहे.

IPL 2024: या दिवसापासून सुरु होणार आयपीएलचा महासंग्राम, ठिकाण, वेळ, तारीखबद्दल समोर आले मोठे अपडेट्स..

धोनी, कोहली, रोहित टॉप 5 मध्ये नाही. (Most Expensive Players  In IPL History)

यावेळी सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये ४ विदेशी आणि फक्त १ भारतीय आहे हे जाणून भारतीय चाहते थोडे निराश झाले असतील. महत्वाचे म्हणजे सर्वाधिक कमाईच्या बाबतीत हे सर्व खेळाडू एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याही पुढे गेले आहेत. यावेळी आयपीएल लिलावात यापूर्वीचे अनेक विक्रम मोडीत निघाले असून चढ्या भावाने खेळाडूंना खरेदी करण्याचा विक्रम निर्माण झाला आहे.

IPL 2024 Auction: स्टार्क, कमिन्सवर पैशांचा पाऊस पडला.

यावेळी आयपीएल 2024 च्या लिलावात फ्रँचायझीने मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर खूप पैसा खर्च केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिशेल स्टार्कला सर्वात महागड्या किमतीत 24.75 कोटींना खरेदी केले, तर सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सला 20.50 कोटींना खरेदी केले. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू असेल.

"मला आणि कमिन्सला आता इतर खेळाडू.." आयपीएलचा सर्वांत महागडा खेळाडू ठरल्यानंतर मिचेल स्टार्कची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

सॅम करनला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरून ग्रीनही चौथ्या क्रमांकावर असेल. IPL 2023 मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते.   मुंबईने नंतर ट्रान्सफर विंडोदरम्यान आरसीबीला ग्रीन विकला

 

Top 5 expensive players in Ipl History

  1. मिचेल स्टार्क: 24.75 कोटी

  2. पॅट कमिन्स :20.50कोटी

  3. सॅम करन: 18.50 कोटी

  4. कॅमेरून ग्रीन: 17.50 कोटी

  5. केएल राहुल: 17 कोटी.

पहिल्या पाचमध्ये फक्त एक भारतीय (IPL 2024 top 5 expensive players)

आयपीएल संघांना लाजा वाटल्या पाहिजे..! सर्वांत महागड्या खेळाडूमध्ये फक्त एक भारतीय; रोहित-धोनी, कोहली, बुमराही पत्तीकम चाय..

आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय खेळाडू केएल राहुल आहे. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 2022 मध्ये 17 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यावेळीही त्याला तेवढाच पगार मिळणार आहे. दुसरीकडे विराट कोहलीला 15 कोटी रुपये, रोहिता शर्माला 16 कोटी रुपये आणि एमएस धोनीला 12 कोटी रुपये मानधन मिळणार आहे.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here