ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

0

 

ODI विश्वचषक 2023 यावर्षी भारतात होणार आहे. आयसीसीने (icc) क्रिकेटच्या या महाकुंभाचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे, तर 19 नोव्हेंबरला विजेतेपदाची लढाई होणार आहे. मात्र, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर टीम इंडियातील काही दिग्गज खेळाडू  आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करू शकतात म्हणजेच निवृत्ती जाहीर करू शकतात  असे मानले जात आहे. म्हणजेच ही मेगा टूर्नामेंट त्यांच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा ठरणार आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला त्या 3 भारतीय खेळाडूंबद्दल  सांगणार आहोत जे एकदिवसीय विश्वचषकानंतर निवृत्त होऊ शकतात. चला तर जाणून घेऊयाकोणते आहेत ते खेळाडू..

रोहित शर्मा (Rohit Sharma)

या यादीत पहिले नाव आहे टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma). त्याचे वय 36 वर्षे आहे, जे त्याच्या फिटनेससाठी समस्या बनत आहे. वाढत्या वयाचा परिणाम त्याच्या खेळावर आणि कामगिरीवर दिसून येत आहे. अशा स्थितीत विश्वचषकानंतर तो निवृत्त होण्याची शक्यता आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ हा रोहित शर्माचा (Rohit Sharma) तिसरा विश्वचषक असेल ज्यामध्ये तो सहभागी होणार आहे. यापूर्वी त्याने २०१५ आणि २०१९ मध्ये या फॉरमॅटमध्ये विश्वचषक खेळला आहे. या दोन्हीमध्ये टीम इंडियाचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास होता.

 

अशा परिस्थितीत यावेळी सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर असतील. पण रोहितबाबत असीही एक अटकळ बांधली जात आहे की, हा वर्ल्डकप संपताच रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करू  शकतो. ती-२० मधून याआधीच त्याचा पत्ता कट झाला आहे. ज्यामुळे वर्ल्डकप नंतर तो एक किंवा २ फोर्मेटमधून निवृत्त होऊ शकतो. यापुढे फक्त कसोती क्रिकेट खेळण्याचे रोहितचे लक्ष असू शकते.

रविचंद्रन अश्विन (Rai Ashwin)

या यादीत दुसरे नाव रविचंद्रन अश्विनचे ​​आहे, ज्याने 2010 साली भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अश्विन 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. अश्विनने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 113 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याला बऱ्याच दिवसांपासून एकदिवसीय संघाचा भाग बनवले जात नाही.

अशा परिस्थितीत 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. अश्विनने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 113 एकदिवसीय आणि 65 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे १५१ आणि ७२ विकेट्स घेतल्या आहेत. तो अखेरचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला होता.

भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी..! आशिया कप 2023 साठी या स्टार खेळाडूची होणार संघात इंट्री, दुखपतीतुन सावरत झालाय पूर्णपणे फिट..

भुवनेश्वर कुमार(Bhuvneshwar Kumar)

या यादीत तिसरा खेळाडू आहे तो म्हणजे टीम इंडियाचा  अनुभवी गोलंदाज  ‘भुवनेश्वर कुमार’. ज्याने आपल्या स्विंग बॉलने जागतिक क्रिकेटमध्ये दहशत निर्माण केली होती.  भुवी बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने शेवटचा सामना डिसेंबर 2022 मध्ये खेळला होता. तेव्हापासून निवडकर्त्यांनी त्याला संधी देणे बंद केले आहे. अलीकडेच, त्याने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये भारतीय क्रिकेटर काढून फक्त भारतीय लिहिले आहे. यानंतर अशी अटकळ बांधली जात आहे.

भुवी लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. त्याने आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 63 विकेट घेतल्याची माहिती आहे. यादरम्यान त्याची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे ९६ धावांत ८ बळी. भुवनेश्वरने 121 वनडेत 141 विकेट घेतल्या आहेत. त्याने 87 टी-20 सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.