विश्वचषक स्पर्धेत या 8 खेळाडूंनी ठोकल्या होत्या एकाचं षटकात सर्वाधिक धावा; यादीत आफ्रिकी खेळाडू सर्वाधिक.

विश्वचषक: कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या भारतीय खेळाडू सर्वाधिक आहेत. मात्र विश्वचषक स्पर्धेत एकाच षटकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये भारतीय खेळाडू कुठेच दिसून येत नाहीत. फलंदाजासाठी ते षटक सोन्यासारखा असलं तरी गोलंदाजांसाठी मात्र ते एका वाईट स्वप्नासारखं ठरले होते. विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंची माहिती पुढील प्रमाणे.

विश्वचषक स्पर्धेत या 8  खेळाडूंनी ठोकल्या होत्या एकाचं षटकात सर्वाधिक धावा; यादीत आफ्रिकी खेळाडू सर्वाधिक.

विश्वचषक स्पर्धेमध्ये एकाच षटकात या 8 खेळाडूंनी काढल्यात सर्वाधिक धावा.

हर्षल गिब्स: गोलंदाजाची बोलती बंद करणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर फलंदाज हर्षल गिब्स याने 2007च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलँड विरुद्ध खेळताना एका षटकात सर्वाधिक 36 धावा काढल्या आहेत. त्याचा हा विक्रम अद्याप कोणत्याच खेळाडूला मोडता आला नाही.

एबी डिव्हिलियर्स : क्रिकेट 360′ या नावाने ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने 2015 विश्वचषकात वेस्टइंडीज विरुद्ध खेळताना एकाच षटकात 32 धावा ठोकल्या आहेत. हर्षलचा विक्रम मोढण्यासाठी त्याला पाच धावा कमी पडल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by AB de Villiers (@abdevilliers17)

डेव्हिड मिलर: गोलंदाजांचा कर्दनकाळ मानला जाणारा, मधल्या फळीतील दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर याने 2015 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध खेळताना एकाच षटकात 30 धावा कुटल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत एका षटकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या तीन स्थानावर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज आहेत.

जेम्स फ्रँकलीन: न्युझीलँडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फ्रँकलीन याने कॅनडा विरुद्ध 2011 मध्ये खेळताना एकाच षटकात 28 धावा चोपल्या होत्या. याची कारकीर्द जास्त वेळ चालली नाही.

डॅरेन लेहमान: ऑस्ट्रेलियाचा बेस्ट फिनिशर मानला जाणारा धष्टपुष्ट खेळाडू डॅरेन लेहमान याने 2003 मध्ये नमिबियाविरुद्ध खेळताना एकाच षटकात 28 धावा केल्याची नोंद आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो कित्येक वर्ष क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता.विश्वचषक स्पर्धेत या 8  खेळाडूंनी ठोकल्या होत्या एकाचं षटकात सर्वाधिक धावा; यादीत आफ्रिकी खेळाडू सर्वाधिक.

ब्रॅडन टेलर : झिंबाब्वे क्रिकेट संघातला सर्वात प्रतिभवान खेळाडू म्हणून ब्रॅडन टेलर कडे पाहिले जात होते. भारतात 2011 मध्ये झालेली विश्वचषक करंडक स्पर्धा त्याने चांगलीच गाजवली. कॅनडा विरुद्ध खेळताना त्याने एकाच षटकात 28 धावा केल्याची नोंद आहे. तसेच याच विश्वचषकात त्याने पाकिस्तान सारख्या जगातल्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजीच्या अटॅक पुढे 28 धावा केल्या होत्या.

हाशिम अमला: कॉपी बुक स्टाईलने फटकेबाजी करणारा तंत्रशुद्ध फलंदाज म्हणजे हाशिम अमला. 2015 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आयर्लंड विरुद्ध खेळताना त्याने 26 धावा काढला.

विश्वचषक स्पर्धेत या 8 खेळाडूंनी ठोकल्या होत्या एकाचं षटकात सर्वाधिक धावा; यादीत आफ्रिकी खेळाडू सर्वाधिक.

ब्रायन लारा : जागतिक कीर्ती लाभलेला वेस्टइंडीज चा महान फलंदाज ब्रायन लारा याने 2003 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील एकाच सामन्यात एका षटकात 26 धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित होता.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *