विराट कोहलीचे शतक पूर्ण करण्यासाठी पंचांच्या रूपात धावून आला देव! सगळीकडे त्यांच्या एका निणर्याचीच चर्चा. वाचा नक्की काय घडले ?

0
1

विराट कोहली: काल   (19 ऑक्टोबरला) भारत आणि बांग्लादेश यांच्यात पुण्यातील स्टेडियमवर विश्वचषकाचा साखळी सामना खेळवला गेला ज्यात भारतीय संघाचा  रन मशीन ‘विराट कोहली’ याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयासह भारताचा हा विश्वचषकातला सलग चौथा विजय तसेच बांगलादेशविरुद्धचा विश्वचषकातला चौथा विजय ठरला. या सामन्यामध्ये काही नाट्यमय घडामोडी घडून आल्या. विराट कोहली शतकासमीप पोहोचल्यावर बांगलादेशच्या खेळाडूंनी त्याचे शतक न होऊ देण्यासाठी काही चाली खेळाल्या.

विराट कोहली

विराटचे शतक पूर्ण होऊ न देण्यासाठी ते जाणून बुजून वाईट चेंडू टाकत होते. मात्र नियतीच्या मनात काळे नव्हते. अखेर देव त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी पंचांच्या रुपात धावून आला, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत होती.

 विराट कोहलीचे शतक पूर्ण होण्याआधी नक्की काय झाले?

त्याचे झाले असे की, विराट 97 धावांवर खेळत असताना बांगलादेशचा फिरकीपटू नसूम हा 42वे षटक टाकण्यासाठी आला होता. विराटचे शतक होऊ नये यासाठी नसूम जाणून-बुजून वाईट चेंडू टाकला. सामन्यात पंच म्हणून काम पाहणारे रिचर्ड केटल ब्रो (Richard Kettleborough)  यांनी नसूमने जाणून बुजून लेफ्ट साईडला टाकलेला चेंडू वाईड दिला नाही. तो डॉट चेंडू समजला गेला. बांगलादेशच्या खेळाडूंचे हे कृत्य जाणून बुजून खेळ भावनेच्या विरुद्ध असल्याने केटल यांनी तो चेंडू वाईड दिला नाही.

बांगलादेशच्या खेळाडूंची ही चाल लक्षात येताच विराटने तिसऱ्या चेंडूवर पुढे येत खणखणीत षटकार ठोकला आणि शतक साजरे केले. त्याच्या शतकानंतर क्रीडा प्रेमींचा आनंद ओसंडून वाहत होता. भारतीय चाहते सोशल मीडियावर बांगलादेशच्या खेळाडूंना धारेवर धरत होते तर दुसरीकडे पंचांनी वाईट चेंडू न दिल्याने आणि विराटला त्याच्या शतकात मदत केल्याबद्दल त्याचे आभार देखील मानत होते.

विराट यंदाच्या विश्वचषकामध्ये जबरदस्त बॅटिंग करत आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. त्याने तीन सामन्यात एक शतक आणि 2 अर्धशतकांसह 256 धावा काढल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट सध्या रोहित शर्मा नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश विरुद्ध ठोकलेले हे शतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे 78 वे शतक ठरले.

सामन्या बाबतीत बोलायचे झाले तर ,बांगलादेशने भारतापुढे विजयासाठी 257 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान विराट कोहलीच्या जबरदस्त शतकी खेळीच्या जोरावर 41.3 षटकात 261 धावात तीन गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय आहे.

विराट कोहली

धावांचा पाठलाग करत असताना विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत हे पहिले शतक ठोकले आहे. तर विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धचे हे दुसरे शतक ठरले.

या विजयासह भारताचे गुणतालिकेत आठ अंक झाले असून भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा चार सामन्यापैकी हा तिसरा पराभव आहे. भारताचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध 22 ऑक्टोंबर रोजी रविवारी होणार आहे.


हेही वाचा:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here