सूर्या चमकला..! तब्बल 1 वर्षानंतर सुर्यकुमार यादवने ठोकले अर्धशतक,ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सूर्याचा जलवा..!

0

सूर्या चमकला..! तब्बल 1 वर्षानंतर सुर्यकुमार यादवने ठोकले अर्धशतक,ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सूर्याचा जलवा..!


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना (IND vs AUS) मोहाली येथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत केवळ 276 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 5 विकेट्स आणि 8 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

या सामन्यात भारताला विश्वचषकापूर्वी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे स्टार फलंदाज ‘सूर्यकुमार यादव’ फॉर्ममध्ये आला आहे. त्याचे अर्धशतक पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर खूप खुश दिसत होते.

पहिल्या एकदिवशीय सामन्यात शुभमन गिलने मोडला किंग कोहलीचा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा खेळाडू…!

सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक ठोकले.

सुर्यकुमार यादव

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव दीर्घकाळापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये नव्हता. गेल्या 28 सामन्यांपासून त्याची बॅट धावा काढण्यासाठी तळमळत होती. शेवटी, यादव ऑस्ट्रेलियाविरुद्ध फोर्ममध्ये आला. मधल्या फळीत सूर्यकुमारने मोठी भूमिका बजावली आणि 49 चेंडूत 50 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान 5 चौकार आणि 1 षटकारही दिसला.

 

जवळपास एका वर्षानंतर सूर्यकुमारच्या बॅटमधून अर्धशतक निघाले. त्याच्या या खेळीनंतर चाहते सोशल मीडियावर खूप खुश दिसत होते. सूर्याचे कौतुक करताना एका यूजरने लिहिले की, ‘आता थांबवणे कठीण आहे भाऊ’. आणखी एका युजरने लिहिले की, “लोक म्हणतात की सूर्या हा फक्त टी-20 खेळाडू आहे’आज सूर्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो जिथे राहतो तिथे तो सूर्यासारखा चमकेल.”

सोशल मिडीयावर सूर्याची स्तुती, पहा ट्वीट..


ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave A Reply

Your email address will not be published.