IPL 2024: विश्वचषक स्पर्धेत धुमाकूळ घालणाऱ्या ‘रचिन रवींद्र’ला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळायचे आहे;स्वतः सांगितली मनातील गोष्ट…

IPL 2024: विश्वचषक स्पर्धेत धुमाकूळ घालणाऱ्या 'रचिन रवींद्र'ला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळायचे आहे;स्वतः सांगितली मनातील गोष्ट...

IPL 2024: न्यूझीलंडने भारतात सुरू असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये शेवटच्या क्षणी उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित केले आहे. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने यंदाच्या विश्वचषकात आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एक गोष्ट म्हणजे तो एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो देखील रवींद्र जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची डावखुरी फिरकी भारतीय खेळपट्ट्यांवर उपयुक्त ठरू शकते, त्यामुळे आयपीएल फ्रँचायझी त्याला आपल्या संघात घेण्यास उत्सुक असतील.

IPL 2024: विश्वचषक स्पर्धेत धुमाकूळ घालणाऱ्या 'रचिन रवींद्र'ला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळायचे आहे;स्वतः सांगितली मनातील गोष्ट...

IPL 2024 चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. दरम्यान, नुकतेच रचिन रवींद्रने त्याच्या आवडत्या आयपीएल संघाबाबत संकेत दिले आहेत. रवींद्रने पहिल्या एकदिवसीय विश्वचषकात 9 सामन्यात 3 शतकांसह 565 धावा केल्या आहेत.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर रचिनने सांगितले की,

“मला एवढा पाठिंबा दिल्याबद्दल मी चिन्नास्वामी स्टेडियम आणि प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांनी माझ्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. मी येथे आणखी क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे.”

IPL 2024: या संघाकडून खेळण्यास उत्सुक आहे रचीन रवींद्र.

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळण्यात त्याला अधिक रस असल्याचे रचिनच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. आता आयपीएल लिलावात त्याला आपल्या गोटात खेचण्यासाठी आरसीबी किती मजबूत असेल हे पाहायचे आहे. विशेष म्हणजे रचिनचे नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावांचे मिश्रण आहे, पण क्रिकेट खेळताना तो विराट कोहलीकडून प्रेरणा घेतो.

IPL 2024: विश्वचषक स्पर्धेत धुमाकूळ घालणाऱ्या 'रचिन रवींद्र'ला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळायचे आहे;स्वतः सांगितली मनातील गोष्ट...

IPL 2024: या दिवशी होणार मिनी लिलाव.

IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबरला होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा लिलाव परदेशात म्हणजेच दुबईत होत आहे. बीसीसीआयने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी फ्रँचायझींना सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबर ही अंतिम तारीख दिली आहे.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *