इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली – रोहित शर्माला नव्या विक्रमाची संधी

 

आयसीसी 2023 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने चमकदार कामगिरी केली आहे. याचे श्रेय जातं ते भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना. या दोघांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडल्याने भारताने विश्वचषकातील सलग पाच सामने जिंकले आहेत. रविवारी होणाऱ्या सामन्यात देखील भारताची नजर विजयावर असून या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. इंग्लंड विरुद्ध विजय मिळवून भारत सेमी फायनल तिकीट पक्के करू शकतो.

 

लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होणाऱ्या विश्वचषकातील 29 व्या सामन्यात रोहित शर्मा आणखीन दोन नव्या विक्रमाला गवसणी घालू शकतो. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला 18 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 18 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी त्याला 47 धावांची गरज आहे.

 

रोहितने 18 हजार धावांचा टप्पा पार केला तर तो सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीच्या क्लब मध्ये जाऊन बसेल. भारताच्या 4 फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजारपेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत रोहितचा परफॉर्मन्स कमालीचा आहे त्याने पाच सामन्यात 311 धावा केल्या आहेत. यात एका दमदार शतकाचा तर एका अर्धशतकाचा समावेश आहे.

 

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यात रोहित आणि विराटला शिखर धवनचा एक विक्रम मोडण्याची संधी आहे. रोहित आणि विराटने नुकतेच झालेल्या आशिया कप स्पर्धेत 5000 धावांची भागीदारी पूर्ण केली होती. त्या दोघांनी मिळून 90 वनडे सामन्यात 5183 धावा केल्या आहेत. यात 18 शतके आणि 17 वेळा अर्धशतकीय भागीदारी रचली आहे. रोहित आणि विराट यांना शिखर धवनचा विक्रम मोडीत काढण्यासाठी 11 धावांची गरज आहे. रोहित आणि धवन यांनी मिळून 5193 धावांची भागीदारी रचली आहे.

 

36 वर्षीय रोहित शर्माने 456 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 43.36 च्या सरासरीने 17,963 धावा काढल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमधील 52 सामन्यात 3677 धावा तर वनडेच्या 256 सामन्यात 10,423 धावांची नोंद त्याच्या नावावर आहे. तसेच 148 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहितने 3853 धावा केल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *