- Advertisement -

“आणि यांना वर्ल्डकप जिंकायचाय…!” अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघासमोर 92 धावाच करू शकला पाकिस्तानी संघ, एक प्रसिद्ध खेळाडूतर स्वत स्टंपला बॅट मारून झाला बाद ..

0 2

“आणि यांना वर्ल्डकप जिंकायचाय…!” अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघासमोर 92 धावाच करू शकला पाकिस्तानी संघ, एक प्रसिद्ध खेळाडूतर स्वत स्टंपला बॅट मारून झाला बाद ..


पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (AFG vs PAK) यांच्यात शुक्रवारी शारजाह येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानच्या घातक गोलंदाजीपुढे पाकिस्तानचे फलंदाज गारद झाले. शादाब खानच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाकिस्तानचा नवा संघ अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर थरथरायला लागला.आणि सर्वच संघ 92 धावांवर बाद झाला.अफगाणिस्तानने हे लक्ष 18 व्या षटकात पूर्ण करत पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.

 खालच्या फळीत षटकार ठोकणारा नसीम शाह मात्र या सामन्यात विचित्र पद्धतीने बाद झाला, ज्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

नसीम शाहला हिटविकेट आउट हे दृश्य 16 व्या षटकात दिसले. पाकिस्तान संघाचे फलंदाज एकामागून एक पॅव्हेलियनमध्ये परतत होते, अशा स्थितीत नसीमने 6 चेंडूत 2 धावा केल्या. या षटकातील चौथा चेंडू मोहम्मद नबीने टाकताच नसीमने त्यावर मोठा फटकाखेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू फिरून त्याच्या पोटावर लागला.

पाकिस्तान

यामुळे नसीम इतका घाबरला की त्याने घाबरून आपली बॅट फिरवली आणि ती स्टंपवर ठेवलेल्या बेल्सवर लागली. बॅटचा स्पर्श होताच बेल्स खाली पडल्या आणि तो हिट-विकेट झाला. हे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. खुद्द नसीमलाही त्याच्या विकेटवर विश्वास ठेवणे कठीण गेले. मात्र सोशल मिडीयावर नाशिम शहाची मस्करी उडवली जात आहे.

नसीम बाद झाल्यानंतर संपूर्ण संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 92 धावा करता आल्या. या सामन्यात पाकिस्तानच्या 4 खेळाडूंनी पदार्पण केले. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी या मोठ्या खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता, मात्र पहिल्या सामन्यात नव्या संघाने ज्या पद्धतीने कामगिरी केली, त्यावरून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

अफगाणिस्तानकडून अप्रतिम गोलंदाजी

पहिल्या T20 मध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानला गुडघे टेकले. फजलहक फारुकीने 4 षटकात 13 धावा देऊन 2 बळी घेतले, तर मुजीबूर रहमानने 4 षटकात 9 धावा देऊन 2 बळी घेतले. मोहम्मद नबीने 3 षटकात 12 धावा देत 2 बळी घेतले. कर्णधार रशीद खान, नवीन उल हक आणि अजमतुल्ला यांनी प्रत्येकी एक बळी घेत पाकिस्तानी फलंदाजांचा धुव्वा उडवला.

पहा व्हीडीओ:


 


 

Leave A Reply

Your email address will not be published.