‘या’ भारतीय खेळाडूने पहिल्यांदा वाढदिवसाच्या दिवशी शतक ठोकून फॅन्सला दिले होते मोठे गिफ्ट!

0
2

‘या’ भारतीय खेळाडूने पहिल्यांदा वाढदिवसाच्या दिवशी शतक ठोकून फॅन्सला दिले होते मोठे गिफ्ट!


बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर विश्वचषक स्पर्धेतील 18 व्या सामन्यात मिचेल मार्श याने धडाकेबाज शतके खेळी करत ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तान विरुद्ध ठोकलेले हे शतक त्याच्यासाठी खास ठरले. विशेष म्हणजे मिचेल मार्श याचा काल 32वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी शतक ठोकणारा तो जागतिक क्रिकेट मधला सहावा खेळाडू ठरला.

AUS vs PAK

तसेच मिचेल मार्श हा विश्वचषक स्पर्धेत वाढदिवसाच्या दिवशी शतक ठोकणारा दुसरा खेळाडू आहे. वाढदिवसा दिवशी शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे तर श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशाचा प्रत्येक एकेक खेळाडूचा समावेश आहे

या खेळाडूंनी वाढदिवसाच्या दिवशी ठोकलेत शतक.

सचिन तेंडुलकर: वाढदिवसाच्या दिवशी शतक ठोकणारा सचिन तेंडुलकर हा दुसरा खेळाडू ठरला. त्याने 24 एप्रिल 1998 साली त्याच्या 25व्या वाढदिवसा दिवशी शारजाहच्या मैदानात चौकार षटकारांची आतिषबाजी केली.ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने तडाखेबाज 134 धावांची खेळी केली होती. सचिनच्या वाढदिवसा दिवशी मॅच असली की तो फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये चांगली चमकदार कामगिरी करून  छाप सोडायचा. मात्र त्याला वाढदिवसाच्या दिवशी शतकी खेळी करता आली नाही.

सचिन तेंडुलकर

रॉस टेलर: 2021 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळताना न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलर याने वाढदिवसा दिवशी दमदार शतक ठोकले. बांगलादेश मधील पलेकेलेच्या मैदानावर खेळताना त्याने 131 धावांची नाबाद शतकी खेळी केली. 8 मार्च 2011 रोजी त्याचा 27वा वाढदिवस होता. तसेच विश्वचषक स्पर्धेत वाढदिवसाच्या दिवशी शतक ठोकणारा तो पहिला खेळाडू आहे.

सनथ जयसूर्या : वयाच्या 39 व्या वर्षी म्हणजेच 30 जून 2008 रोजी श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्या याने बांगलादेश विरुद्ध खेळताना कराचीचे मैदान गाजवून सोडले. अत्यंत अनुभवी असलेल्या या खेळाडूने 130 धावांची ऐतिहासिक खेळी केली. जयसूर्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम रचले आहेत.

'या' भारतीय खेळाडूने पहिल्यांदा वाढदिवसाच्या दिवशी शतक ठोकून फॅन्सला दिले होते मोठे गिफ्ट!

विनोद कांबळी: डावखुरा फलंदाज विनोद कांबळी हा वाढदिवसाच्या दिवशी शतक ठोकणारा जगातला व भारताचा पहिला खेळाडू आहे. त्याने 18 जानेवारी 1993 रोजी वयाच्या 21व्या वर्षी इंग्लंड विरुद्ध खेळताना दमदार शतक ठोकले. जयपूरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात त्याने शंभर धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. एक मोठा खेळाडू असून देखील त्याला आपली क्रिकेटमधील कारकीर्द वाढवता आली नाही.

आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा ही जसजशी पुढे जात आहे तसतसे विक्रमांचा पाऊस पडत आहे. प्रत्येक सामन्यात उलटफेअर पाहायला मिळत आहे. तर काही सामने एकतर्फी झालेले आहेत. क्रिकेट प्रेमींना अत्यंत चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत.


हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here