Sachin Tendulkar Records: विराट नाही तर ‘या’ खेळाडूने मोडला सचिन तेंडूलकरचा मोठा विक्रम,विश्वचषक सामन्यात मोठी कामगिरी..

Sachin Tendulkar Records: क्रिकेटमध्ये शतकांचे शतक ठोकणारा एकमेव खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 51 तर वनडे क्रिकेटमध्ये 49 शतके ठोकली आहेत. मात्र सचिनचा शतकांचा असा एक विक्रम आहे जो नुकताच एका ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंने मोडीत काढला आहे. सलामीला खेळताना सचिन तेंडुलकरने एकूण 45 सामन्यात शतके ठोकली आहेत. त्याचा हा विक्रम नुकताच डेव्हिड वॉर्नरने मोडीत काढला आहे.

Sachin Tendulkar Records: सलामीवीर म्हणून खेळतांना ‘या’ खेळाडूंनी ठोकलीत सर्वाधिक शतके. (Most Centuries by opener in international cricket)

 Sachin Tendulkar Records विश्वचषक स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये सचिन तेंडूलकरचाच बोलबाला,पहा यादी.

कमी वयात दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणारा ग्रॅमी स्मिथ याने त्याच्या कारकिर्दीत सलामीला खेळताना एकूण 37 शतके ठोकली आहेत. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने वनडे मध्ये 10 तर टेस्टमध्ये 27 शतके ठोकली आहेत.

इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कुक याने नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारले आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये कसोटी 33 व एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 शतके ठोकली आहेत. एकेकाळी तो सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेट मधला सर्वाधिक धावांचा विक्रम मोडू शकेल असे अनेकांना वाटत होते मात्र तसे झाले नाही.

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर खेळाडू मॅथ्यू हेडन याने कसोटीत 30 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 शतके ठोकल्याची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला आक्रमक खेळण्याची सुरुवात मॅथ्यू हेडन पासून सुरुवात झाली.

 World Cup[ 2023: 'विश्वचषकात टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणं ही अभिमानाची गोष्ट' वर्ल्डकपच्या एकदिवस आधी रोहित शर्माने देशाबद्दल केले मोठे वक्तव्य..

नव्या पिढीचा आदर्श खेळाडू म्हणजे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने सलामीला खेळताना 41 शतके ठोकली आहेत. कसोटीत 10 तर वनडे मध्ये 31 शतके ठोकली आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीला हा खेळाडू सहाव्या स्थानावर खेळत होता. फलंदाजीमधील त्याचे कौशल्य पाहून महेंद्रसिंग धोनीने त्याला सलामीला खेळण्याची संधी दिली.

श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या याने त्याच्या कारकिर्दीमध्ये 41 शतके ठोकल्याचे नोंद आहे.

कसोटीत 14 तर वनडे क्रिकेटमध्ये 28 शतके ठोकली आहेत. फलंदाजीमधील त्याचे कौशल्य पाहून अर्जुन रणतुंगाने त्याला सलामीला खेळण्याची संधी दिली.

वेस्टइंडीजची रनमशीन मानली जाणारा क्रिस गेल याने त्याच्या कारकिर्दीमध्ये सलामीला खेळताना 42 शतके ठोकली आहेत. गेल ने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये सर्वच स्फोटक खेळी केल्या आहेत.

Sachin Tendulkar Records

सचिन तेंडुलकर: शतकांचे शतक करणारा सचिन तेंडुलकर याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये सलामीला खेळताना 45 सामन्यात शतके ठोकली आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीला सचिन तेंडुलकर मधल्या फळीत खेळत होता. 1992 पासून तो सलामीला खेळण्यास सुरुवात केला.

सलामीला खेळताना सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये सध्या ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा पहिल्या स्थानावर आहे. त्याने क्रिकेटमध्ये 47 वेळा शतकी खेळी केली आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सचिनचा हा विक्रम वॉर्नरने मोडीत काढलाय.


हेही वाचा:

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *