ICC ODI World Cup 2023: तब्बल 12 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये खेळणार ‘हा’ संघ, विश्वचषक पात्रता फेरीत जबरदस्त खेळ दाखवून मिळवली संधी..!

ICC ODI World Cup 2023: तब्बल 12 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये खेळणार 'हा' संघ, विश्वचषक पात्रता फेरीत जबरदस्त खेळ दाखवून मिळवली संधी..!

ICC ODI World Cup 2023: तब्बल 12 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये खेळणार ‘हा’ संघ, विश्वचषक पात्रता फेरीत जबरदस्त खेळ दाखवून मिळवली संधी..!


ICC ODI World Cup 2023:  भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाईल. ४५ दिवस चालणाऱ्या या वनडे विश्वचषक स्पर्धेत १० संघ सहभागी होत असून एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत.एका संघासाठी ही स्पर्धा खूप खास असणार आहे. हा संघ १२ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक खेळताना दिसणार आहे. गेल्या सलग दोन विश्वचषक स्पर्धेतून बाहेर ठेवल्यानंतर हा संघ पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे.

या संघाने तब्बल १२ वर्षांनंतर विश्वचषकात प्रवेश केला!

नेदरलँडचा संघ १२ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक खेळताना दिसणार आहे. मागील सलग दोन विश्वचषक स्पर्धांमधून बाहेर ठेवल्यानंतर, नेदरलँड संघ २०२३ च्या आयसीसी विश्वचषकातून क्रिकेटच्या मेगा स्पर्धेत परतला आहे. याआधी नेदरलँड संघ चार वेळा (1996, 2003, 2007 आणि 2011) एकदिवसीय विश्वचषक खेळला आहे.

World cup 2023

विराट कोहली पुन्हा होणार बापमाणूस..! अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर,लवकरच विराटच्या घरी नवा पाहुणा…

विश्वचषक पात्रता फेरीत दाखवला होता शानदार खेळ..

2023 विश्वचषक पात्रता फेरीत उपविजेते राहून नेदरलँड्सने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीत दोन वेळचे चॅम्पियन वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, अमेरिका, ओमान आणि नेपाळ यांना पराभूत करून विश्वचषकात प्रवेश केला आहे. नेदरलँड्सने आतापर्यंत विश्वचषकात स्कॉटलंड आणि नामिबियासारख्या संघांनाच पराभूत केले आहे. तथापि, एकदिवसीय क्रिकेटमधील नेदरलँडचा यंदाचा विक्रम त्यांच्या क्रिकेट इतिहासातील एकूण विक्रमाच्या तुलनेत खूपच चांगला राहिला आहे. अशा स्थितीत यावेळी ती अनेक संघांचा खेळ खराब करू शकते.

ICC ODI World Cup 2023: तब्बल 12 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये खेळणार 'हा' संघ, विश्वचषक पात्रता फेरीत जबरदस्त खेळ दाखवून मिळवली संधी..!

विश्वचषक २०२३ साठी नेदरलँड संघ

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रमजीत सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाइन, वेस्ली बॅरेसी (विकेटकीपर), साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट


हेही वाचा:

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *