SA vs ENG: दक्षिण आफ्रिका-इंग्लंड सामन्यात पडला विक्रमांचा पाऊस, एक नाही तर तब्बल 6 विक्रम मोडले गेले..

0

 

SA vs ENG: आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवून स्पर्धेत तिसरा विजय मिळवला. शनिवारी झालेल्या या सामन्यात गतविजेता इंग्लंडचा 229 धावांनी पराभव झाला. वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडचा हा सर्वाधिक धावांनी झालेला पराभव आहे. यापूर्वी 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नच्या सामन्यात 221 धावांनी पराभव झाला होता. स्पर्धेतला हा इंग्लंडचा तिसरा पराभव आहे.

ENG vs RSA: दक्षिण आफ्रिकेपुढे गत विजेत्या इंग्लंडच्या संघाने टेकले गुडघे; तब्बल 229 धावांनी झाला सर्वात मोठा पराभव..

या विजयासह दक्षिण आफ्रिकेचे सहा गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड विरुद्ध कालच्या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. हे विक्रम इंग्लंडचा संघ लवकरात लवकर विसरण्याचा विचारत असेल. या विक्रमावर एक नजर टाकूया.

SA vs ENG सामन्यात झाले हे ६ विक्रम

1.गुरुवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड 7 बाद 399 समोर धावांचा डोंगर उभा केला. वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने आतापर्यंत इतक्या धावा इंग्लंड विरुद्ध खेळताना केले नाहीत. यापूर्वी 2015 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना न्यूझीलंडने पाच बाद 398 धावा केल्या होत्या.

2. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा 229 धावांनी सर्वात मोठा पराभव झाला. वनडे क्रिकेट मधला इंग्लंडचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात 221 धावांनी पराभव केला होता.

3. विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत सहा वेळा दोनशेपेक्षा अधिक धावांनी विजय मिळवला आहे. या विक्रमामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ टॉपवर आहे. तर वन डे क्रिकेटमध्ये 15 वेळा 200 पेक्षा जास्त धावांनी दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात पाच वेळा 200 पेक्षा अधिक धावांनी विजय मिळवला होता.

4. हेनरिक क्लासेन आणि मार्को यानसन यांनी सहाव्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेकडून सहाव्या विकेटसाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

SA vs ENG: दक्षिण आफ्रिका-इंग्लंड सामन्यात झालाय विक्रमांचा पाऊस, एक नाही तर तब्बल 6 विक्रम मोडले गेले..

5. हेनरिक क्लासेन आणि मार्को यानसन यांनी सहाव्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी रचली ही भागीदारी करत असताना त्यांनी 11.92 च्या सरासरीने धावा काढल्या. वन डे विश्वकप स्पर्धेत दीडशेपेक्षा अधिक धावांची पार्टनरशिप करताना हा सर्वात मोठा रन रेट होता. यापूर्वी 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेल आणि शेल वॉटसन यांनी 11.70 रन रेटने 160 धावांची भागीदारी केली होती.

6.. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड यांनी दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यात त्याने 5 षटकार लगावले. यापूर्वी तीन फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे, ज्यांनी दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाच किंवा त्यापेक्षा अधिक षटकार ठोकलेत.


हेही वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.