Ind vs Aus: तिसऱ्या एकदिवशीय सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, शुभमन गिल- हार्दिक पंड्यासह हे 3खेळाडू अंतिम सामन्यातून बाहेर, समोर आले मोठे कारण..
भारत आणि ऑस्ट्रेलिया (ind vs aus) यांच्यात 3 वनडे मालिकेतील तिसरा सामना बुधवारी होणार आहे. राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. मात्र, भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडेपूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardi pandya) व्यतिरिक्त सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल प्लेइंग 11 चा भाग असणार नाहीत.
या खेळाडूंशिवाय मैदानात उतरणार टीम इंडिया…
हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे मालिकेतील पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांमध्येही भारतीय प्लेइंग 11 चा भाग नव्हते. पण असे मानले जात होते की, राजकोट येथील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल भारतीय प्लेइंग 11 मध्ये परत येऊ शकतात. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांच्याशिवाय सलामीवीर शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर हे तिसर्या वनडेमध्ये सहभागी होणार नाहीत. इंदोर वनडेत शुभमन गिलने शानदार शतक झळकावले होते. या सामन्यात शुभमन गिलने 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.

मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना राजकोटमध्ये होणार.
हार्दिक पांड्याशिवाय शुभमन गिल, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांची प्लेइंग 11 मध्ये अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पण भारतीय संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला तरी, मालिका केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाच जिंकणार आहे. उल्लेखनीय आहे की, मोहालीमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव केला होता. यानंतर इंदोरमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव केला. तिसऱ्या आणि अंतिम एकदिवशीय सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचीही संघात वापसी होऊ शकते.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..