IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया यांच्यातील पहिला सामना आज मोहालीमध्ये रंगणार, विराट- रोहित नाही तर ‘हे’ 11 खेळाडू आहेत भारतीय संघाचा हिस्सा..

0
936

IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया यांच्यातील पहिला सामना आज मोहालीमध्ये रंगणार, विराट- रोहित नाही तर ‘हे’ 11 खेळाडू आहेत भारतीय संघाचा हिस्सा..


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची मालिका (IND vs AUS) शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज (22 Sep) मोहालीत खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ विजयाने मालिकेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.

भारताने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे, तर ऑस्ट्रेलिया देखील पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या स्टार खेळाडूंशिवाय मैदानात उतरेल. असे असूनही दोन्ही संघांना कमी लेखता येणार नाही.

नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत (AsiaCup2023) भारतीय फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती. सलामीवीर शुभमन गिल आणि केएल राहुलने शतके झळकावली, तर इशान किशननेही काही चांगली खेळी केली. मात्र, सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजा फलंदाजीमध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे ही सिरीज या दोघांसाठी एकदिवशीय वर्ल्डकपमध्ये आपले स्थान निच्छित करण्याची आणखी एक संधी असेल.

IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया यांच्यातील पहिला सामना आज मोहालीमध्ये रंगणार, विराट- रोहित नाही तर 'हे' 11 खेळाडू आहेत भारतीय संघाचा हिस्सा..

दुखापतीतून सावरलेल्या श्रेयस अय्यरलाही या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा फोर्ममध्ये येण्याची संधी असेल.गोलंदाजीच्या बाबतीत भारत खूप मजबूत दिसत आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराज (Mohmmad Siraj) हे जबरदस्त फॉर्मात आहेत, तर फिरकी विभागात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी बऱ्याच काळानंतर एकत्र मैदानात दिसणार आहे.

ऑस्ट्रेलियाला अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3-2 ने एकदिवसीय मालिका पराभवाचा सामना करावा लागला आणि संघाला भारताविरुद्ध निश्चितच मालिका जिंकायला आवडेल. फलंदाजीत डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श आणि मार्नस लॅबुशेन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, तर दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या स्टीव्ह स्मिथच्या आगमनाने बळ दिले आहे. गोलंदाजी आघाडीवर संघ थोडा कमकुवत दिसत आहे पण कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना हलक्यात घेता येणार नाही. अॅडम झाम्पासुद्धा भारतात बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे.ip

IND vs AUS

 

या दोन संघांमध्ये आतापर्यंत 146 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 82 तर भारताने 54 सामने जिंकले आहेत. 10 सामन्यांचा निकाल लागला नाही. त्याचबरोबर मोहालीतही ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. त्याने सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना 2019 मध्ये याच मैदानावर झाला होता. उच्च धावसंख्येच्या सामन्यात कांगारू संघाने चार विकेट्स राखून विजय मिळवला.

संभाव्य प्लेईंग 11 (ind vs aus Probable playing 11)

भारत:केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा/वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर.

INDvsAUS probable playing 11
INDvsAUS probable playing 11

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, मार्कस स्टॉइनिस, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा.

खेळपट्टी आणि हवामान अंदाज (IND vs AUS Pitch Report & Weather Updates)

मोहालीची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली आहे. अलिकडच्या काळात येथे केवळ उच्च स्कोअरिंग सामने पाहिले गेले आहेत. मात्र, वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये प्रभाव पाडू शकतात. हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल आणि संध्याकाळी दव पडल्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे होऊ शकते.  म्हणूनच नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निणर्य घेऊ शकतो.

भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरू होईल. टॉसची वेळ दुपारी १ वा. हा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 वर पाहता येईल. मोबाईल वापरकर्ते हे जिओ सिनेमा अॅप्लिकेशनवर वर सामना लाइव्ह पाहू शकतात.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here