IND vs AUS: तिसऱ्या एकदिवशीय सामन्यातील पराभवानंतरही कर्णधार रोहीत शर्मा खुश, सामन्यानंतर केले मोठे वक्तव्य..

IND vs AUS: तिसऱ्या एकदिवशीय सामन्यातील पराभवानंतरही कर्णधार रोहीत शर्मा खुश, सामन्यानंतर केले मोठे वक्तव्य..


भारत आणि ऑस्ट्रोलीया (IND vs AUS) यांच्यातील  राजकोट येथे खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवशीय सामन्यात  भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतासमोर विजयासाठी 353 धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ 49.4 षटकात केवळ 286 धावांवरच मर्यादित राहिला. मात्र, या पराभवानंतरही भारतीय संघाने ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ अशी जिंकण्यात यश मिळवले. मात्र, तिसऱ्या वनडेतील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपले मत व्यक्त केले. रोहित शर्मा म्हणाला की, मी ज्या प्रकारे शॉट्स खेळू शकतो त्यामुळे मी खूप खूश आहे. गेल्या ७-८ एकदिवसीय सामन्यांमध्ये आमच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे, असेही तो म्हणाला.

Ind vs Aus: आज शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रोलियाचा पराभव झाल्यास सर्वांत मोठा नकोसा विक्रम होईल त्यांच्या नावावर,2020 नंतर पहिल्यांदाच घडतंय असे.

राजकोटमधील पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

 

रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या संघांविरुद्ध आव्हानांचा सामना केला. मला वाटते आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. आज आम्हाला विजय मिळवता आला नसला तरी, आमच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, ज्यामुळे मी खुश आहे. जसप्रीत बुमराह ज्याप्रकारे गोलंदाजी करत आहे त्यामुळे तो खूप खूश असल्याचे त्याने सांगितले. विशेषत: जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटत आहे. याशिवाय या गोलंदाजामध्ये कौशल्याची कमतरता नाही.

 

जसप्रीत बुमराहवर रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य..

IND vs AUS: तिसऱ्या एकदिवशीय सामन्यातील पराभवानंतरही कर्णधार रोहीत शर्मा खुश, सामन्यानंतर केले मोठे वक्तव्य..

 

भारतीय कर्णधार म्हणाला की, जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जाणवत आहे ते आमच्यासाठी चांगले लक्षण आहे. विश्वचषकासाठी आमच्या १५ सदस्यीय संघाबाबत आम्ही स्पष्ट आहोत, आम्ही कोणत्याही संभ्रमात नाही, अस देखील यावेळी रोहित म्हणाला. खरंतर, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात भारतीय संघाचा भाग नव्हता. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने संघाची कमान सांभाळली होती के.एल. राहुल च्या नेतृत्वात भारतीय संघाने सुरवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती..


हेही वाचा:

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *