Preity Zinta open ups casting couch:’बॉलीवूड हे मुलींसाठी बनले नाही, तरून मुलींकडे फक्त त्याच नजरेने…” बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ने केला धक्कादायक खुलासा..!

Preity Zinta open ups casting couch:'बॉलीवूड हे मुलींसाठी बनले नाही, तरून मुलींकडे फक्त त्याच नजरेने..." बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ने केला धक्कादायक खुलासा..!

Preity Zinta open ups casting couch: बॉलिवूडची डिंपल्ड गर्ल प्रीती झिंटाचे (Preity Zinta) नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत असायचे. या अभिनेत्रीने 1998 मध्ये शाहरुख खानचा ‘दिल से’ चित्रपट केला होता. या अभिनेत्रीने तिच्या पहिल्याच चित्रपटाने लोकांना वेड लावले. आपल्या 26 वर्षांच्या करिअरमध्ये अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले जे खूप पसंत केले गेले.

सध्या जरी ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये कमी सक्रिय असली तरी तिच्या वक्तव्यांमुळे ती दररोज खूप चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तिने दावा केला आहे की, बॉलिवूड मुलींसाठी सुरक्षित नाही.  (Preity Zinta open ups casting couch  )तिच्या या वक्तव्याने आता तिलाही याआधी कास्टिंग काऊच सामना करावा लागला आहे, हे सिद्ध होतंय. नक्की काय म्हणाली प्रीती  आपल्या व्हिडीओ मध्ये जाणून घेऊया सविस्तर..

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रीती झिंटाने इंडस्ट्रीला मुलींसाठी असुरक्षित म्हटले आहे.

बॉलीवूडची डिंपल गर्ल म्हणजेच प्रीती झिंटाचे (Preity Zinta)इंडस्ट्रीत सक्रिय नसली तरी तिच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. ही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. दरम्यान, या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने धक्कादायक दावा केला असून मुला-मुलींसाठी बॉलिवूड हे सुरक्षित ठिकाण का नाही? कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय बॉलिवूडमध्ये करिअर करणाऱ्या मुलींसाठी ही जागा सुरक्षित नाही, असा खुलासा प्रीती झिंटाने केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रिती झिंटाने (Preity Zinta) सांगितले बॉलिवूडचे सत्य!

प्रिती झिंटा(Preity Zinta)  नेहमीच तिच्या स्वच्छ वर्तनासाठी आणि बिनधास्त विधानांसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने तिच्या व्हिडिओमध्ये याबद्दल मोकळेपणाने बोलले. प्रीती म्हणाली,

ज्या मुलींची कोणतीही पार्श्वभूमी नाही अशा मुलींसाठी बॉलीवूड हे सुरक्षित ठिकाण नाही, हे फिल्मी पार्श्वभूमीबद्दल नाही, तर सर्वांबद्दल आहे. याचे कारण म्हणजे भूमिका मिळवण्यासाठी बरेच लोक काहीही करायला तयार असतात.” उदाहरणार्थ, प्रीती झिंटा म्हणाली, हे असे आहे की रस्त्याच्या मधोमध उभे राहून, आ बैल मुझे मार म्हणणे..

चाहते प्रिती झिंटाच्या बोलण्याशी सहमत असल्याचे दिसतेय.

प्रीती झिंटाच्या जुन्या वक्तव्यावर आता सोशल मीडिया यूजर्स आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “ती अगदी बरोबर आहे, कास्टिंग काउच खूप वाढले आहे.” आणखी एका युजरने लिहिले की, “प्रीती खूप प्रामाणिक आणि आत्मविश्वासू आहे. त्यांना स्वतःचे संरक्षण कसे करावे हे माहित आहे.

Preity Zinta open ups casting couch:'बॉलीवूड हे मुलींसाठी बनले नाही, तरून मुलींकडे फक्त त्याच नजरेने..." बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ने केला धक्कादायक खुलासा..!

तिच्या करिअरच्या शिखरावर असतानाही मी तिच्याबद्दल कधीही वाईट बातमी ऐकली नाही.” आणखी एका युजरने लिहिले की, “समस्या अशी आहे की तिने या सर्व गोष्टी जेव्हा तिची कारकीर्द जवळपास संपली होती तेव्हा ती बोलली, जेव्हा ती काम करत होती तेव्हा ती पूर्णपणे शांत होती.” प्रीती झिंटा लवकरच सनी देओलसोबत लाहोर १९४७ या चित्रपटात दिसणार आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *