IND vs AUS: ऑस्ट्रोलीयाविरुद्धच्या 3 सामन्याच्या एकदिवशीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित नाही तर सुनी शेट्टीच्या जावयाकडे संघाची कमान..
IND vs AUS: यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने किंवा बीसीसीआयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून संघाची घोषणा केली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी कांगारूंचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्याच वेळी, भारतीय निवडकर्त्यांनी या मालिकेत (IND vs AUS) शक्तिशाली फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती दिली आहे.
खरं तर, सोमवार, 19 रोजी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा केली. पहिल्या दोन सामन्यांसाठी आणि मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी वेगवेगळे संघ निवडण्यात आले आहेत.
हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पहिल्या दोन सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय रवींद्र जडेजाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. रविचंद्रन अश्विनलाही पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले आहे. मात्र, संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
या सामन्यातून विराट कोहली करणार संघात पुनरागमन.
उल्लेखनीय बाब म्हणजे हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, रोहित शर्मा, अक्षर पटेल आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी संघात परतणार आहेत. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात सहभागी झालेले तिलकक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघाबाहेर राहावे लागणार आहे.
तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल. या मालिकेनंतर भारतीय संघाला आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ खेळायचा आहे. भारताची मोहीम ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
IND vs AUS: पहिल्या आणि दुसऱ्या ODI सामन्यांसाठी भारताचा संघ
पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यासाठी संघ: केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सनदार , आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्ण.
तिसऱ्या सामन्यासाठी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर , अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मो शमी, मो सिराज.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..