IND vs NZ LIVE: मोहम्मद शमीने रचला इतिहास, विश्वचषक स्पर्धेत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला नंबर 1 गोलंदाज..

0

IND vs NZ: मोहम्मद शमी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याचा फक्त सहावा सामना खेळत आहे. सेमीफायनल मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 4 विकेट घेत त्याने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याचे अजून चार षटके बाकी आहेत. त्याच्या पहिल्या दोन षटकांत त्याने संघाला पहिले दोन यश मिळवून दिले. त्यानंतर विल्यमसन आणि मिशेल क्रीझवर असताना तो आला आणि त्याने एकाच षटकात दोन बळी घेतले. त्याने वर्ल्डकपमध्ये 50 विकेट्सही पूर्ण केल्या.

या विश्वचषकात सहाव्या सामन्यातच 20 विकेट घेणार्‍या मोहम्मद शमीने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला . आता 50 विकेट घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तसेच, तो जगातील सर्वात जलद 50 विश्वचषक विकेट घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने सर्वात कमी सामने आणि सर्वात कमी चेंडू अशा दोन्ही बाबतीत हा विक्रम आपल्या नावावर केला आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकले.

 

विश्वचषकातील सर्वात जलद 50 विकेट्स घेणारे गोलंदाज (सामन्यानुसार)

  • 17 सामना- मोहम्मद शमी

  • १९ सामना- मिचेल स्टार्क

  • 25 सामना- लसिथ मलिंगा

  • 28 सामना- ट्रेंट बोल्ट

विश्वचषकातील सर्वात जलद 50 विकेट्स (बॉलद्वारे)

 

  • ७९५ चेंडू- मोहम्मद शमी

  • 941 चेंडू- मिचेल स्टार्क

  • 1187 चेंडू- लसिथ मलिंगा

  • 1540 चेंडू- ग्लेन मॅकग्रा

  • १५४३ चेंडू- ट्रेंट बोल्ट

 IND vs NZ LIVE: मोहम्मद शमीने रचला इतिहास, विश्वचषक स्पर्धेत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला नंबर 1 गोलंदाज..

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद सिराजची जादू कायम..

मोहम्मद शमीबद्दल बोलायचे झाले तर तो २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत प्रभाव पाडत आहे. फक्त नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. याशिवाय प्रत्येक सामन्यात त्याने विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या साखळी सामन्यात त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्ध चार, श्रीलंकेविरुद्ध पाच आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन यश मिळाले.


  • हेही वाचा:
Leave A Reply

Your email address will not be published.