IND vs NZ T20: एकदिवशिय सामन्याची मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचे आता T20 वर लक्ष ,पहा कधी? कुठे आणि कसा पाहू शकता पहिला सामना..
वनडेमध्ये क्लीन स्वीप केल्यानंतर टीम इंडियाला आता टी-20 मध्ये किवीजचा पराभव करायचा आहे. पहिला टी-20 सामना 27 जानेवारीला होणार आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे मूळ गाव रांची येथे हा सामना खेळला जाणार आहे.
टीम इंडियाने याआधीच न्यूझीलंडचा वनडे मालिकेत व्हाईटवॉश केला आहे. अशा स्थितीत भारतीय संघाचे इरादे बुलंद आहेत. हार्दिक पांड्या टी-२० मध्ये कर्णधार असेल. विराट कोहली आणि रोहित शर्माला टी-20 संघात संधी देण्यात आलेली नाही.
हवामान कसे असेल?

हवामान खात्यानुसार रांचीचे हवामान स्वच्छ राहील. शुक्रवारी आकाश खुले राहील. येथील दिवसाचे तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. रात्री ते घसरेल आणि पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. रांचीमध्ये दिवसभर आणि सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. म्हणजेच सामन्यादरम्यान कोणताही व्यत्यय येणार नाही.
रांचीचे जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम हे भारतातील इतर मैदानांपेक्षा वेगळे आहे. हे स्टेडियम थोडे मोठे आहे. अशा खेळपट्ट्या फलंदाजीसाठी चांगल्या असतात आणि खूप धावाही होतात. यापूर्वी रांचीमध्ये तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.
2016 मध्ये येथे झालेल्या T20 सामन्यात 196 धावा झाल्या होत्या. त्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकदा 118 आणि एकदा 196 धावा केल्या.
हे ही वाचा..
पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू स्वतःला म्हणतोय विराट कोहली पेक्षा श्रेष्ठ..
हृदयद्रावक घटना!गोलंदाजी करत असताना ३२ वर्षीय तरुणाने गमावला जीव