- Advertisement -

0,0,0,W,W,W,0… रणजी ट्रॉफीमध्ये जयदेव उनाडकटने घातला धुमाकूळ,हॅट्ट्रिक तर घेतलीच शिवाय दोन षटकातच केले 5 गडी बाद, असा विक्रम करणारा ठरला रणजीच्या इतिहासातील आजवरचा पहिलाच गोलंदाज..

0 0

0,0,0,W,W,W,0… रणजी ट्रॉफीमध्ये जयदेव उनाडकटने घातला धुमाकूळ,हॅट्ट्रिक तर घेतलीच शिवाय दोन षटकातच केले 5 गडी बाद, असा विक्रम करणारा ठरला रणजीच्या इतिहासातील आजवरचा पहिलाच गोलंदाज..


भारतीय कसोटी संघामध्ये तब्बल 12 वर्षाने पुनरागमन करून चांगली कामगिरी करणारा गोलंदाज जयदेव उनाडकट सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे. त्याने आपल्या जबरदस्त प्रदर्शनाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. जयदेव उनाडकटने रणजी ट्रॉफी सामन्यात दिल्लीविरुद्ध धोकादायक गोलंदाजी केली होती. उनाडकटने पहिल्या दोन षटकांत पाच बळी घेतले. पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला.

आज रणजी मध्ये सौराष्ट आणि दिल्ली यांच्यात सामना खेळवला जात होता. त्यात दिल्लीचा कर्णधार यश धूलने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र गोलंदाज जयदेव उनाडकटने त्याचा हा निणर्पूर्णत चुकीचा सिद्ध करत पहिल्याच षटकात आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याने सलामीवीर ध्रुव शौरी, वैभव रावल आणि कर्णधार यश धूल यांना बाद करत तंबूत पाठवले. ज्यामुळे दिल्लीचे प्रमुख गोलंदाज उनाडकटच्या गोलंदाजीचे शिकार होत मैदानातुन बाहेर पडले.

उनाडकटने आपल्या ९८व्या प्रथम श्रेणी सामन्यात खेळताना २१व्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 350 हून अधिक विकेट घेतल्या आहेत.

उनाडकटने पहिल्याच षटकातच हॅटट्रिक घेतली.

 जयदेव उनाडकट

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली आणि तिसऱ्या चेंडूवरच त्यांची पहिली विकेट पडली. पुढच्या दोन चेंडूत पुन्हा विकेट पडल्या आणि उनाडकटने हॅट्ट्रिक पूर्ण केली.

दुसऱ्याच षटकात दिल्लीचे खाते उघडले, पण त्यांनी आणखी एक विकेट गमावली. तिसरे षटक टाकायला आलेल्या उनाडकटने पुन्हा दोन बळी घेतले आणि दिल्लीची धावसंख्या केवळ 5 धावांत 6 विकेट्स अशी झाली.


हेही वाचा:

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T-20 सामन्यात surya kumar yadav आणि yuzvendra chahal करू शकतात हे मोठे विक्रम,चहलला तर आहे मोठी सुवर्णसंधी, होऊ शकतो अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज.

IND vs SL 1st T-20: ईशान किशन की संजू सैमसन? कर्णधार हार्दिक पांड्या कोणाला देईल संधी? श्रीलंकेविरुद्ध पहिल्या ट्वेंटी सामन्यात असा असू शकतो अंतिम 11 खेळाडूंचा भारतीय संघ.. या खेळाडूच्या कामगिरीवर असणार सर्वांचे लक्ष..

अपघात झाला तेव्हा रिषभ पंत ला मदत करण्याएवजी त्याच्या गाडीतील पैश्याची बॅग घेऊन पळाले उत्तराखंडमधील तरुण, अपघाताचे CCTV फुटेज होतंय सोशल मिडियावर व्हायरल.. पहा व्हिडीओ..

Leave A Reply

Your email address will not be published.