- Advertisement -

MI vs CSK… महामुकाबल्या आधी मुंबई इंडियन्सचे खेळाडू धोनीच्या भेटीला, थालाने दिला युवा खेळाडूंना असा सल्ला, व्हिडीओ व्हायरल..

0 6

MI vs CSK… महामुकाबल्या आधी मुंबई इंडियन्सचे खेळाडू धोनीच्या भेटीला, थालाने दिला युवा खेळाडूंना असा सल्ला, व्हिडीओ व्हायरल..


शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (MUMBAI INDIANS) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CHENNAI SUPER KINGS) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ मुंबईत पोहोचले असून, संघांचे सराव सत्रही सुरू झाले आहे. महेंद्रसिंग धोनीबाबत मुंबईच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईत पोहोचल्यानंतर धोनीने मुंबई इंडियन्स संघाच्या खेळाडूंचीही भेट घेतली आहे. ज्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

धोनीने मुंबई इंडियन्सच्या युवा खेळाडूंशी संवाद साधला..

मुंबई इंडियन्स

महेंद्रसिंग धोनीने वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची भेट घेतली आणि संवाद साधला. यादरम्यान त्याने मुंबईचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनशीही बराच वेळ चर्चा केली. इशान किशन आणि एमएस धोनी एकाच राज्य झारखंडचे आहेत. चेन्नईचे इतर खेळाडू रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो हे देखील मुंबईच्या खेळाडूंशी बोलताना दिसले.

यादरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरही स्टेडियममध्ये पोहोचला आणि त्याने मुंबईच्या खेळाडूंना टिप्स दिल्या. सचिनने फलंदाजांना फलंदाजीचे तंत्र शिकवले आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हरला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या घरी हा सामना खेळवला जात आहे. जिथे त्याच्यावर दबाव असेल.चेन्नईला घरच्या मैदानात हरवून यंदाच्या आयपीएल मधील पहिला विजय मिळवण्यास मुंबई इंडियन्स उत्सुक असेल.

मुंबईप्रमाणेच चेन्नई सुपर किंग्जनेही गुजरात टायटन्सविरुद्धचा पहिला सामना गमावला. मात्र, धोनीच्या संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत विजय मिळवला. अशा स्थितीत रोहित आणि धोनी यांच्यातील हा सामना रंजक होण्याची अपेक्षा आहे. कारण जिथे मुंबईला विजयाच्या मार्गावर परतायचे आहे, तिथे चेन्नईला आपली लय कायम राखायला आवडेल.हा सामना उद्या खेळवला जाणार आहे.


क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

न्यूझीलंड विश्वचषकमधून बाहेर तर फेकला गेला मात्र, कर्णधार ‘केन विल्यमसन’ जाता जाता भारताच टेंशन वाढवणार वक्तव्य करून गेलाय..

या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..

Leave A Reply

Your email address will not be published.