MI vs GG LIVE: गुजरातची कर्णधार ‘बेथ मूनीने’ नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू…
ऐतिहासिक महिला प्रीमियर आजपासून सुरु झाले आहे. पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार असून त्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/my_minds_tweet/status/1632014148598124545?s=20
नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. गुजरातच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर नाणेफेक गमावून फलंदाजी करण्यास सज्ज झाली आहे.
पहिल्या सामन्याआधी पार पडला शुभारंभ सोहळा..
महिला आयपीएल मधील पहिल्या सामन्याआधी नवी मुंबईच्या स्टेडियमवर मोठा ओपनिंग समारंभ पार पडला. ज्यात बॉलीवूड स्टार्सनी आपल्या अनोख्या अंदाजात परफोर्म केले.

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (w/c), सबिनेनी मेघना, हरलीन देओल, अॅश्लेग गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, दयालन हेमलता, जॉर्जिया वेयरहम, स्नेह राणा, तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (w), हरमनप्रीत कौर (क), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतीमणी कलिता, सायका इशाक
रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..