एकदिवशीय विश्वचषकमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी ठोकलेत सर्वाधिक शतके, यादीमध्ये दिग्गज खेळाडूचाही समावेश..

एकदिवशीय विश्वचषकमध्ये 'या' 4 फलंदाजांनी ठोकलेत सर्वाधिक शतके, यादीमध्ये दिग्गज खेळाडूचाही समावेश..

विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू: भारतात सुरु असलेला विश्वचषक 2023 (World Cup 2023) सध्या अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. जवळपास सर्वच 10 संघाचे एक किंवा दोन सामने बाकी राहिले आहेत. त्यानंतर या स्पर्धेच्या सेमीफायनल लीगला सुरवात होईल. दोन सेमीफायनल झाले की, 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना खेळवला जाईल. त्याच दिवशी जगाला विश्वविजेता कोण हे कळणार आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का?  आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अनेक देशांच्या दिग्गज खेळाडूंनी भाग घेतला आहे. आणि अनेक दिग्गज विक्रम आपल्या  नावे केले आहेत. त्यातील एक विक्रम म्हणजे विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतक कुणाच्या नावावर आहेत?

एकदिवशीय विश्वचषकमध्ये 'या' 4 फलंदाजांनी ठोकलेत सर्वाधिक शतके, यादीमध्ये दिग्गज खेळाडूचाही समावेश..

आज या खास लेखामध्ये आपण विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतक कुणाच्या नावावर आहेत, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरवात करूया आजच्या या लेखाला.

एकदिवशीय विश्वचषकमध्ये सर्वाधिक शतक करणारे 4 फलंदाज ( 4 player who scored more centurys in odi worldcup)

1. रोहित शर्मा (Rohit Shamra)

असा आहे रोहित शर्माचा डायट प्लान (Rohit Sharma's Diet Plan)

या यादीत पहिले नाव भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे(Rohit Shamra) आहे, ज्याने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारा तो जगातील चौथा आणि भारतातील एकमेव खेळाडू आहे. याशिवाय एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा रोहित शर्मा जगातील पहिला खेळाडू आहे. एकदिवशीय विश्वचषकाच्या  17 सामन्यात 6 शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

2. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)

रोहित शर्मानंतर या यादीत दुसरे नाव भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) आहे, ज्याने विश्वचषकात रोहित शर्माच्या बरोबरीने 6 शतके झळकावली आहेत. सचिन 1992 ते 2011 पर्यंत एकदिवसीय विश्वचषकाचा भाग होता.

Most Half Century In World Cup

यादरम्यान त्याने 44 डावांमध्ये 6 शतके झळकावली आहेत. तो २०११ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाचा सदस्य होता.सचिनने 6 शतके साजरे करण्यासाठी रोहित पेक्षा जास्त सामने खेळले आहेत, ज्यामुळे सचिन या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

3.कुमार संगकारा (Kumar Sanghkara)

या यादीत तिसरे नाव आहे श्रीलंकेचा माजी महान फलंदाज कुमार संगकाराचे (Kumar Sanghkara) , ज्याने विश्वचषकात एकूण 5 शतके झळकावली. संगकारा 2003 ते 2015 या कालावधीत एकदिवसीय विश्वचषकाचा भाग होता. यादरम्यान त्याने 35 डावांमध्ये 5 शतके झळकावली. श्रीलंकेकडून सर्वाधिक शतके ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे.

4. रिकी पाँटिंग (Riki Ponting)

Riki Ponting Yuvakatta

या यादीतील पुढचे नाव ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचे आहे, ज्याने वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके झळकावली आहेत. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 46 एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये 5 शतके झळकावली आहेत. पाँटिंगने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला दोन वनडे विश्वचषक जिंकून दिले आहेत. (player who hit most century in odi worldcup)


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *