वयाची तिशी पार केल्यानंतर ‘या’ खेळाडूंनी जिंकलाय सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार; पहा विराटची आकडेवारी.

मॅन ऑफ द मॅच: क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूला शेवटी ‘मॅन ऑफ द मॅच’ किताब देऊन सन्मानित करण्यात येते. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच खेळाडू सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवतात, हे आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे. पण हा किताब पटकवण्यामध्ये अनुभवी खेळाडू देखील तरुण खेळाडूंना मागे टाकलेले दिसून येत आहेत. भारतीय क्रिकेट संघात असे काही आजी-माजी खेळाडू आहेत ज्यांनी वयाच्या तिशीनंतर सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला आहे.

रोहित शर्मा  : वयाच्या तिशीनंतर सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा तडफदार खेळाडू हिटमॅन रोहित शर्मा  हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या वयाच्या तिशीनंतर 15 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे. पूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

IND vs BAN: “बांग्लादेशने भारतला हरवल्यास मी चक्क…” पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशी खेळाडूंना मोठी ऑफर, भारताला हरवा आणि माझ्यासोबत..

वर्ल्ड कप 2023 : इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर कर्णधार रोहीत शर्मा, बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित मोडू शकतो हा मोठा विक्रम..

सचिन तेंडुलकर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वयाची तिशी ओलांडल्यानंतर 14 वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये देखील तो टॉपवर आहे.

मोहम्मद अझरुद्दीन: स्टायलिश फलंदाज व माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने वयाच्या तिशीनंतर बहारदार खेळीचे प्रदर्शन घडवले. त्यामुळे त्याला 11 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकल्यामुळे मोहम्मद अझरुद्दीन वर आजीवन क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. असे झाले नसते तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यामध्ये तो अव्वल राहिला असता.

वयाची तिशी पार केल्यानंतर 'या' खेळाडूंनी जिंकलाय सर्वाधिक वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार; पहा विराटची आकडेवारी.

 विराट कोहली : ऍक्टिव्ह खेळाडू म्हणजेच विराट कोहली याला त्याच्या कारकीर्दीत वयाच्या तिशीनंतर 9 सामन्यात मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवण्यात यश आले. भारतीय खेळाडूंच्या या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. आणखीन तीन-चार वर्षाच्यानंतर विराट कोहली या यादी टॉप वर आलेला पाहायला मिळेल.

दोस्ती मैं बदली दुश्मनी! मैत्रीच्या रंगात रंगले विराट कोहली -नवीन हक, पहा व्हिडिओ

वीरेंद्र सेहवाग: स्फोटक फलंदाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने वयाच्या तिशीनंतर एकापेक्षा एक अशा सरस खेळी केल्या होत्या. त्याबद्दल त्याला नऊ वेळा मॅन ऑफ द मॅच चा किताब मिळाला. वयाच्या तिशी नंतर सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे.

वयाच्या तिशीनंतर सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोनच खेळाडू सध्या ॲक्टिव्ह आहेत. इतर सर्व खेळाडू हे क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. हे दोघेही आणखीन तीन-चार वर्ष क्रिकेट सहज खेळू शकतात. त्यामुळे या विक्रमामध्ये आणखीन भर पडू शकते.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *