विश्वचषक 2023 मध्ये सतराव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात बांगलादेश ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करत असताना नव्या षटकातच भारताला मोठा धक्का बसला. नवव्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी आला तेव्हा लिटन दास यांनी मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह चा शॉट आडवत असताना त्याचा पाय मुरगळला. त्यामुळे हार्दिक पांड्या वेदनेने कळवळत मैदाना बाहेर गेला. फिजिओने मैदानात येऊन त्याच्या पायाला मलमपट्टी बांधली.
हार्दिक पांड्याने नवव्या षटकात केवळ तीनच चेंडू फेकले. यात लिटन दासने त्याला दोन चौकार मारले. उर्वरित षटक पूर्ण करण्यासाठी रोहित शर्माने किंग कोहलीला बोलवले. तीन चेंडू टाकून कोहलीने हे षटक पूर्ण केले. या तीन चेंडूत त्याने अवघ्या दोनच धावा दिल्या. कोहली गोलंदाजी करण्यासाठी आला होता तेव्हा स्टेडियम मधून कोहली कोहली असा आवाज देत प्रेक्षक त्याला प्रोत्साहन देत होते.
GLIMPSE OF 3 BALLS OF KOHLI
Virat Kohli Bowling #IndvBan pic.twitter.com/rwqZvXpvrc— Maryeeb (@maryeeb9) October 19, 2023
विराट कोहलीने 8 वर्षानंतर गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला यापूर्वी त्याने 2017 मध्ये प्रेमादासा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळताना गोलंदाजी केली होती. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विराट कोहलीने गोलंदाजी करणे कमी केले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तो मध्यम गती गोलंदाजी करायचा. 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या क्वाटर फायनल आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना धोनीने त्याला गोलंदाजी करण्यासाठी चेंडू सोपवला होता.
कोहली गोलंदाजी करत असताना चेहऱ्यावर गॉगल लावला होता. गोलंदाजी करताना स्टेडियम मधून एकच कोहली कोहली असा मोठा आवाज येऊ लागला. या आवाजाने मैदान दणाणून गेले. हार्दिक पांड्याला झालेली दुखापत ही किती गंभीर आहे हे पाहण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पांड्या चा स्कॅन रिपोर्ट अद्यापही प्राप्त झाला नसून त्याची दुखापत गंभीर असल्यास भारताला मोठे नुकसान सोसावे लागेल.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी