सचिनच्या मुलाने फलंदाजी करतांना केली मोठी चूक ज्यामुळे सहकारी फलंदाज ‘नेहल वढेरा’ अर्जुन तेंडूलकरला मैदानावरच झापले , व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
सचिनच्या मुलाने फलंदाजी करतांना केली मोठी चूक ज्यामुळे सहकारी फलंदाज ‘नेहल वढेरा’ अर्जुन तेंडूलकरला मैदानावरच झापले , व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) ला जबरदस्त रीत्या पराभूत करत मोठा विजय प्राप्त केला. या सामन्यात गुजरातने (GT)आपल्या फलंदाजीसोबतच उत्कृष्ट गोलंदाजीही सादर केली, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला (Mi) ५५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
त्याचवेळी या सामन्यात सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar)त्याच्या आयपीएल कारकिर्दीत प्रथमच फलंदाजी करताना दिसला. पण त्याने फलंदाजी करतानामोठी चूक केली. . त्यानंतर मधल्या मैदानावरच मुंबईचा स्फोटक फलंदाज नेहल वढेरा त्याच्यावर भडकला.

नेहल वढेराने (Nehal Vadhera) अर्जुन तेंडुलकरला मैदानावरच झापले…
वास्तविक या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) लक्ष्याचा पाठलाग करत होती. संघाचे सर्व आघाडीचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. नेहल वढेरा (Nehal Wadhera ) आणि अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) क्रीजवर फलंदाजी करत होते.
दरम्यान, नेहल वढेरा (Nehal Wadhera ) वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या (Mohit Sharma) चेंडूला मारण्याचा प्रयत्न करतो आणि चेंडूचा संपर्क नीट होत नाही. नॉन स्ट्राइकवर उभ्या असलेल्या अर्जुन तेंडुलकरला धावायचे होते, पण नेहल वढेराने नकार देऊनही अर्जुन पळाल्यामुळे त्यालाही आपली विकेट धोक्यात घालून धाव घ्यावी लागली.. अर्जुनच्या या कृत्यानंतर नेहल चांगलाच संतापला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो.
पहा व्हिडीओ..
https://twitter.com/sachhikhabars/status/1650920075871031296?s=20
अर्जुनने मारला कारकिर्दीतील पहिला षटकार..
अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) या सामन्यात शानदार गोलंदाजी केली आणि 2 षटकांच्या स्पेलमध्ये 9 धावा देऊन 1 बळीही घेतला. त्याच्या फलंदाजीदरम्यान त्याने शेवटच्या षटकात वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या (Mohit Sharma) पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकला आणि या शॉटचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, नंतर मोहितने आपल्या षटकाराचा बदला घेत अखेरच्या षटकात अर्जुन तेंडुलकरला बाद केले.