SA vs AUS: तर सेमीफायनल न खेळताच दक्षिण आफ्रिका डायरेक्ट फायनलमध्ये खेळणार, ऑस्ट्रोलिया संघाची डोकेदुखी वाढली.. !

SA vs AUS: विश्वचषक २०२३ च्या पहिल्या उपांत्य फेरीत आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सामना होणार आहे. दुसरा बाद फेरीचा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (SA vs AUS) यांच्यात गुरुवारी 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.

त्याआधी  5 वेळा चॅम्पियन टीम ऑस्ट्रेलिया संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे. उपांत्य फेरी न खेळता तो स्पर्धेतून बाहेर पडू शकतो.आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार कोलकातामध्ये गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे दुसरा उपांत्य सामना झाला नाही, तर नियमानुसार ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीतून बाहेर पडेल.

SA vs AUS: काय आहेत विश्वचषक 2023 चे उपांत्य फेरीसाठी नियम?

विश्वचषक 2023 च्या नियमांबद्दल बोलायचे तर, सामना पूर्ण होण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 20 षटके खेळणे आवश्यक आहे. जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत ऑस्ट्रेलियापेक्षा वरचा असल्याने रविवारी अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. साखळी टप्प्यात भारत आपले सर्व 9 सामने जिंकून अव्वल स्थानावर होता तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर होता.

SA vs AUS: हवामान विभागाचा अंदाज नक्क्की काय?

हवामान विभागाचे प्रादेशिक संचालक गणेश दास यांनी सांगितले की, गुरुवारी कोलकत्तामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि संध्याकाळीही पाऊस पडू शकतो. दिवस जसजसा पुढे जाईल तसतसा पाऊस थोडा अधिक तीव्र होऊ शकतो. शुक्रवारी  तरआणखी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि हे खरे ठरल्यास दोन्ही दिवशी खेळ होऊ शकेल  याची शक्यता कमी आहे.

SA vs AUS: तर सेमीफायनल न खेळताच दक्षिण आफ्रिका डायरेक्ट फायनलमध्ये खेळणार, ऑस्ट्रोलिया संघाची डोकेदुखी वाढली.. !

SA vs AUS: सेमिफायनमध्ये किती वेळा  भिडलेत दोन्ही संघ?

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत यापूर्वी दोनदा आमनेसामने आले आहेत. 1999 दरम्यान खेळलेला सामना बरोबरीत सुटला होता, मात्र साखळी फेरीतील विजयामुळे कांगारू संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात यशस्वी ठरला. 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कांगारू संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला होता. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेलाही यावेळी बदला घ्यायला आवडेल.


  • हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *