SA vs BAN: वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डीकॉक याने बांगलादेशच्या गोलंदाजाची धुलाई केली. दक्षिण आफ्रिकेच्या या यष्टीरक्षक फलंदाजाने अक्षरशः मैदानात चौकार षटकारांची आतिषबाजी करत 174 धावांची खेळी केली. आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये क्विंटन डीकॉकचे हे तिसरे शतक ठरले. डीकॉकने स्फोटक खेळी करत 102 धावा केवळ चौकार अन षटकाराच्या माध्यमातून मिळवल्या.
SA vs BAN: क्विंटन डीकॉकने ठोकले विश्वचषक 2023 मधील तिसरे शतक
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय क्विंटन डी कॉकने एकदम बरोबर बरोबर ठरवला. डीकॉकने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करण्यास सुरुवात करत बांगलादेशच्या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. क्विंटनने शतक ठोकल्यानंतर विशाल असे रूप धारण केले. चौकार षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला त्यांनी केवळ 140 चेंडूत 174 धावांची ऐतिहासिक खेळी केली. या खेळी त्याने 15 चौकार आणि सात उत्तुंग षटकार ठोकले.
क्विंटन डीकॉक ने यष्टीरक्षक म्हणून खेळताना 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला. डीकॉकने 174 धावांची दमदार खेळी करत 16 वर्षाचा ॲडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडीत काढला. गिलख्रिस्टने 2007 मध्ये श्रीलंका विरुद्ध खेळताना 149 धावांची खेळी केली होती.
या शतकासह क्विंटन डिकॉकने एकाच विश्वचषक स्पर्धेत तीन शतके ठोकण्याचा एबी डिव्हिलर्स याचा विक्रम मोडीत काढला. साऊथ आफ्रिकेकडून एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आता डिकॉकच्या नावावर झाला आहे. एबी डिव्हिलियर्स याने 2011 साली खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन शतके लगावली होती.
सामन्या बाबतीत बोलायचं झाले तर, साऊथ आफ्रिका विरुद्ध झालेल्या सामन्यात बांगलादेशचा संघ हा पत्त्याप्रमाणे कोसळून गेला आणि संपूर्ण संघ 233 धावांवर बाद झाला. साऊथ आफ्रिकेने हा सामना 149 धावांनी जिंकला. क्विंटन डीकॉकच्या या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेश विरुद्धचा वर्ल्डकप मधील हा सर्वात तिसरा मोठा विजय ठरला.
दक्षिण आफ्रिकेचा या विश्वचषक स्पर्धेतील पाच पैकी हा चौथा विषय आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. नेट-रनरेटच्या आधारावर आफ्रिकेने न्यूझीलंडला पाठीमागे टाकले. चार विजयासह दक्षिण आफ्रिकेचे एकूण आठ गुण झाले आहेत. दुसरीकडे बांगलादेशच्या बाबतीत बोलायचे झाले तर बांगलादेशचा हा पाचव्या सामन्यातील चौथा पराभव आहे. बांगलादेशचे सेमी फायनल मधील पोहोचण्याचे सर्वच रस्ते आता बंद झाले आहेत. स्पर्धेत बांगलादेशला केवळ एकच विजय मिळवता आला आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी