World Cup 2023: अश्विन, शार्दुल की अक्षर पटेल? कोण होणार वर्ल्डकप संघातून बाहेर.. बीसीसीआयपुढे अनोखा पेच.. दोघांना करावे लागणार बाहेर..
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑफस्पिनर रवी अश्विनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. रवी अश्विननेही आपल्या गोलंदाजीने संघ व्यवस्थापनाला निराश केले नाही. ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रवी अश्विनने 10 षटकात 47 धावा देत 1 बळी घेतला. यानंतर इंदोर वनडेमध्ये रवी अश्विनने 7 षटकांत 41 धावांत 3 खेळाडू बाद केले. विशेषत: डेव्हिड वॉर्नरसह डाव्या हाताचे फलंदाज रवी अश्विनच्या गोलंदाजीसमोर झुंजताना दिसले.
रवी अश्विन वर्ल्डकप संघाचा भाग.
ऑस्ट्रेलिया मालिकेत चांगली गोलंदाजी केल्यानंतर रवी अश्विनने विश्वचषकासाठी आपले स्थान निश्चित केले आहे. असं मानले जात आहे. रवी अश्विन आशिया कप 2023 चा भाग नव्हता. यानंतर जखमी अक्षर पटेलच्या जागी रवी अश्विनचा ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियात समावेश करण्यात आला.

आकडेवारी दर्शवते की, रवी अश्विन हा डाव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध अत्यंत प्रभावी पर्याय ठरत आहे. त्याचबरोबर कुलदीप यादवला स्पिनर म्हणून भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. मात्र, याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा असेल. अक्षर पटेलच्या फिटनेसवर प्रश्न कायम आहेत.
World Cup 2023: अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूरपेक्षा रवी अश्विनला प्राधान्य मिळेल का?
वर्ल्डकपसाठी भारतीय संघात एकही ऑफस्पिनर नाही. अशा परिस्थितीत ऑफस्पिनर म्हणून संघ व्यवस्थापनासमोर रवी अश्विन हा एकमेव पर्याय आहे… त्यामुळे रवी अश्विन विश्वचषक संघाचा भाग होण्याची शक्यता आहे. जर रवी अश्विन खेळला तर अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांचे संघातील स्थान कमी होऊ शकते. अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांच्यापेक्षा भारतीय संघ व्यवस्थापन रवी अश्विनला प्राधान्य देऊ शकते.
रवी अश्विनची वनडे कारकीर्द
आकडेवारी दर्शवते की, रवी अश्विनने आतापर्यंत भारतासाठी 115 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 115 सामन्यांमध्ये रवी अश्विनने 4.95 च्या इकॉनॉमी आणि 33.2 च्या सरासरीने 155 खेळाडूंना बाद केले आहे. रवी अश्विनची वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे २५ धावांत ४ बळी. याशिवाय गरज पडल्यास रवी अश्विन आपल्या फलंदाजीने योगदान देऊ शकतो. रवी अश्विनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 86.96 च्या स्ट्राइक रेटने आणि 16.44 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत.
त्यामुळे आता 5तारखेपासून सुरु होणाऱ्या वर्ल्डकपसाठी बीसीसीआय आणि निवड समिती कोणाला संघात जागा देतात आणि कोणाला बाहेर काढतात हे पाहणे रंजक ठरणार आहे..
हे पण वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल.