संजू सॅमसनसोबत राजकारण होतंय…! संजूला पुन्हा प्लेईंग 11मधुन बाहेर केल्यानंतर भडकले चाहते, रोहित शर्मा आणि निवड समिती होतेय ट्रोल..

संजू सॅमसनसोबत राजकारण होतंय...! संजूला पुन्हा प्लेईंग 11मधुन बाहेर केल्यानंतर भडकले चाहते, रोहित शर्मा आणि निवड समिती होतेय ट्रोल..

IND vs AFG 1st T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील T20 मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे सुरु झाला आहे. या मॅचमध्ये रोहित शर्मा 14 महिन्यांनंतर टी-20 इंटरनॅशनलमध्ये परतला आणि तो कर्णधार होताना दिसला. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी त्याने प्लेइंग 11 मध्ये संजू सॅमसनला संधी दिली नाही. यानंतर सोशल मीडियावर चर्चा अटळ होती. यशस्वी जैस्वाल, ज्याच्याबद्दल राहुल द्रविडने एक दिवसापूर्वी एक अपडेट दिले होते की तो ओपन करेल, परंतु आता तो या सामन्यातून बाहेर आहे.

IND vs AFG 1st T20 : यशस्वी जैस्वाल जखमी, शुभमन गिल करणार डावाची सुरवात.

नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माने यशस्वी जैस्वाल पूर्णपणे तंदुरुस्त नसून निवडीसाठी उपस्थित नसल्याचे सांगितले. बीसीसीआयने यशस्वीबद्दल ट्विट करून माहिती दिली की, त्याच्या उजव्या मांडीला दुखापत आहे ज्यामुळे तो हा सामना खेळू शकणार नाही.  मांडीचा सांधा हा शरीराचा एक भाग आहे जो मांडी आणि पोटाचा खालचा भाग जोडतो. या समस्येमुळे यशस्वी या सामन्यात खेळू शकला नाही. त्यामुळे आता शुभमन गिल आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करू शकतात.

संजू सॅमसनसोबत राजकारण होतंय...! संजूला पुन्हा प्लेईंग 11मधुन बाहेर केल्यानंतर भडकले चाहते, रोहित शर्मा आणि निवड समिती होतेय ट्रोल..

IND vs AFG 1st T20 : संजू सॅमसनला वगळण्यावर प्रश्न, मनेहमीच संजू वर केला जातो अन्याय?

नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्या नंतर कर्णधार रोहित शर्माने प्लेईंग 11 ची घोषणा केली ज्यात प्रामुख्याने युवा खेळाडू संजू सॅमसनचे नाव नव्हते. या सामन्यात सुद्धा त्याला संघातून बाहेर ठेवले गेले. संजू सॅमसनला वगळल्याने चाहते पुन्हा एकदा सोशल मीडियावर संतापले आहेत. संजूची फसवणूक होत असल्याचे अनेकदा बोलले जात होते. त्याला नंतर बाहेर फेकले जाईल. पण आता त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान न मिळाल्याने वेगळे वाद निर्माण झाले आहेत.

यानंतर चाहते संतापले आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी लिहू लागला. संजूऐवजी जितेश शर्माची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली. तर सोशल मीडियावर लोकांनी म्हटले की, संजू आणि जितेश दोघेही एकत्र खेळू शकले असते. काही लोकांनी याला संघातील राजकारण असेही म्हटले.

 

IND vs AFG 1st T20 : सॅमसनला संघातून बाहेर केल्यानंतर भडकले चाहते, पहा ट्वीटस.

 


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *