AUS vs PAK: विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची स्फोटक शैली पाहायला मिळाली. संघासाठी डेव्हिड वॉर्नर 163 धावा करून मैबाद झाला तर. त्याच्यासोबत डावाची सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या मिचेल मार्शची स्फोटक शैलीही पाहायला मिळाली. पाकिस्तानविरुद्ध डावाची सुरुवात करताना त्याने 108 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो 112.03 च्या स्ट्राइक रेटने 121 धावा करण्यात यशस्वी झाला. या काळात त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 9 उत्कृष्ट षटकार ठोकले.
AUS vs PAK: वाढदिवसाच्या दिवशी मिचेल मार्शने ठोकले शानदार शतक..
मार्शसाठी आजचा दिवस खास आहे. तो 20 ऑक्टोबर रोजी 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. या काळात पाकिस्तानविरुद्धच्या शतकाने त्याच्या आनंदात आणखी भर पडली आहे. विश्वचषकाच्या इतिहासात वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर शतक झळकावणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी या विशेष कामगिरीची नोंद फक्त न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी फलंदाज रॉस टेलरच्या नावावर आहे. टेलरने 2011 मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते.
14. Mitchell Marsh 121 (108 balls)
Against Pakistan
(20/10/2023)#PAKvsAUS pic.twitter.com/c7PSgcn4z0— Doyo ♡ (@Read_and_love) October 20, 2023
विश्वचषकात त्यांच्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर शतक झळकावणारे फलंदाज:
१३१* धावा – रॉस टेलर (२७वा) – न्यूझीलंड – विरुद्ध पाकिस्तान – २०११
१२१ धावा – मिचेल मार्श (३२वे) – ऑस्ट्रेलिया – विरुद्ध पाकिस्तान – २०२३
एकदिवसीय फॉर्मेटमध्ये त्यांच्या वाढदिवशी शतक झळकावणारे फलंदाज:
140* धावा – टॉम लॅथम (30वा) – न्यूझीलंड – विरुद्ध नेदरलँड्स – हॅमिल्टन – 2022
१३४ धावा – सचिन तेंडुलकर (२५वा) – भारत – विरुद्ध ऑस्ट्रेलिया – शारजाह – १९९८
130 धावा – सनथ जयसूर्या (39वा) – श्रीलंका – विरुद्ध बांगलादेश – कराची – 2008
100* धावा – विनोद कांबळी (21वा) – भारत – विरुद्ध इंग्लंड – जयपूर – 1993
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी