ENG vs NED: बेन स्टोकसचे शानदार शतक ते आदिल रशीदची धारदार गोलंदाजी.. इंग्लंडने नेदरलँड्सचा केला 160 धावांनी पराभव.

0

ENG vs NED: ICC विश्वचषक 2023 मध्ये, इंग्लंडने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला आणि चालू स्पर्धेत त्यांचा दुसरा विजय नोंदवला. पुण्यात खेळल्या गेलेल्या 40व्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 339 धावा केल्या. बेन स्टोक्सने 108 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या 84 चेंडूंच्या खेळीत 6 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.

त्यांच्याशिवाय डेव्हिड मलान 87, ख्रिस वोक्स 51, जॉनी बेअरस्टो 15, जो रूट 28, हॅरी ब्रूक 11 आणि कर्णधार जोस बटलर केवळ 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने 3, आर्यन दत्त आणि लोगन व्हॅन बीकने 2, 2 आणि मॅकरिनने 1 बळी घेतला. इंग्लंडच्या 340 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संपूर्ण संघ 37.2 षटकांत 179 धावांवर बाद झाला.

 ENG vs NED: बेन स्टोकसने ठोकले शानदार शतक .

 ENG vs NED

नेदरलँड्सकडून स्कॉट एडवर्ड्स ३८ धावा करून, वेस्ली ब्रेसी ३७ आणि सायब्रँड ३३ धावा करून बाद झाले. याशिवाय डी लीडे 10, मॅक्स ओ’डॉड 5 आणि मॅक्रिन 4, कॉलिन अकरमन आणि व्हॅन डर मर्वे शून्यावर बाद झाले, तर व्हॅन बीक 2 आणि आर्यन दत्त 2 धावा करून बाद झाले. तेजा निदा मिनोरूने 41 धावा केल्यानंतर नाबाद राहिली, पण ती आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. इंग्लंडच्या मोईन अली आणि आदिल रशीदने 3-3 खेळाडूंना बाद केले.

सध्याचे चॅम्पियन इंग्लंड आणि नेदरलँड्स आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहेत. वर्ल्डकपच्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर या यादीत इंग्लंड 8 मॅचमध्ये 2 विजय मिळवून 4 पॉईंट्ससह 7व्या स्थानावर आहे, तर नेदरलँड्स 8 पॉइंट्ससह 10व्या स्थानावर आहे.

 ENG vs NED

विश्वचषक उपांत्य फेरीच्या दृष्टीने जरी हा सामना महत्वाचा नसला तरी देखील Champion Trophy च्या  दृष्टीने हा सामना महत्वाचा होता. जो इंग्लंडने जिंकला आहे.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave A Reply

Your email address will not be published.