IND vs AUS 2nd ODI: क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी.. रद्द होऊ शकतो Ind vs Aus दुसरा एकदिवशीय सामना, समोर आले मोठे कारण..
IND vs AUS 2nd ODI: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ (Odi world cup 2023) च्या आधी होणारी ही मालिका दोन्ही संघांसाठी तयारीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाने मालिकेची शानदार सुरुवात केली आणि मोहालीत खेळला गेलेला पहिला एकदिवसीय सामना 5 विकेटने जिंकला. आता उभय संघांमधला पुढचा सामना आज (२४ सप्टेंबर)ला इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये सामन्यादरम्यान खराब हवामानामुळे पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अहवालानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, रात्री हवामान जवळजवळ स्वच्छ राहू शकते. इंदूरच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर आज दुपारी 1 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येथे पावसाची 40-50 टक्के शक्यता आहे.
यानंतर ही शक्यता 20 टक्क्यांपेक्षा कमी होईल. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.
पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक..
मोहाली एकदिवसीय सामना जिंकून, भारतीय संघाने आयसीसी क्रिकेट संघ क्रमवारीत तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 संघ स्थान प्राप्त केले. आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी त्यांना इंदोर वनडे सामनाही जिंकणे आवश्यक आहे. जर टीम इंडिया हे करण्यात यशस्वी ठरली तर ते वनडे वर्ल्ड कपमध्ये नंबर-1 टीम म्हणून खेळतील..
भारतीय संघासाठी मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद शमीची जादू पाहायला मिळाली. ज्यात त्याने अर्ध्या कांगारू संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठा दिलासा म्हणजे सूर्यकुमार यादवने 50 धावा केल्या. आज दोन्ही संघ कशी कामगिरी करतील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

असे असू शकतात दोन्ही संघ.
भारत – शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..