IND vs NED: अंतिम लीग सामन्यात टीम इंडियामध्ये होणार मोठे बदल, एक नव्हे तर या 4 खेळाडूंची होणार संघातून सुट्टी..!

0

IND vs NED : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, टीम इंडियाला 12 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूच्या मैदानावर नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा गट स्टेज सामना खेळायचा आहे. यापूर्वी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ नोव्हेंबरला खेळली होती. जिथे संघाने 243 धावांनी विजय मिळवला.

तर नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे प्लेईंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल करू शकतात आणि या सामन्यात अनेक खेळाडूंना  आराम दिला जाऊ शकतो असे बोलले जात आहे. चला तर जाणून घेऊया अगदी सविस्तर..

वर्ल्डकप 2023

उपांत्य फेरीपूर्वी कर्णधार-कोचने घेतला अजब निर्णय, गिलसह ३ खेळाडूंना विश्राम.

कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलला विश्रांती देऊ शकतात. कारण, टीम इंडियाला या सामन्यानंतर उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे आणि टीम नेदरलँड्ससारख्या कमकुवत संघाविरुद्ध आपल्या आश्वासक खेळाडूंना विश्रांती देऊ इच्छित आहे. तर शुभमन गिलच्या जागी विकेटकीपर फलंदाज इशान किशनला सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते, असे मानले जात आहे.

सिराज आणि कुलदीप यादवलाही मिळू शकतो आराम.

 ENG vs NED: बेन स्टोकसचे शानदार शतक ते आदिल रशीदची धारदार गोलंदाजी.. इंग्लंडने नेदरलँड्सचा केला 160 धावांनी पराभव.

 

12 नोव्हेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात संघ भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनाही विश्रांती देऊ शकतो आणि त्यांना प्लेईंग 11 मधून बाहेर काढू शकतो. कारण, हे दोन्ही खेळाडू आशिया चषकापासून सतत खेळत आहेत, त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी संघ या दोन खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो. त्यांच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

IND vs NED: अंतिम लीग सामन्यात टीम इंडियामध्ये होणार मोठे बदल, एक नव्हे तर या 4 खेळाडूंची होणार संघातून सुट्टी..!

नेदरलँड्सविरुद्ध टीम इंडियाचा संभावित संघ

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave A Reply

Your email address will not be published.