IND vs NZ 1st Semifinal: पहिल्या सेमीफायनलमध्ये ‘रोहित शर्मा’कडे विश्वविक्रम रचण्याची संधी, या 5 दिग्गज खेळाडूंचा विक्रम निशाण्यावर..

IND vs NZ 1st Semifinal: पहिल्या सेमीफायनलमध्ये रोहित शर्माकडे विश्वविक्रम रचण्याची संधी, या 5 दिग्गज खेळाडूंचा विक्रम निशाण्यावर..

IND vs NZ 1st Semifinal: विश्वचषक 2023 (World Cup 2023) आता अंतिम टप्प्यावर पोहचला आहे. 2सेमीफायनल सामने आणि नंतर एक फायनल असे केवळ 3 सामनेच उरले आहेत. यात  टीम इंडिया जेतेपदापासून फक्त दोन विजय दूर आहे. टीम इंडियाचा पहिला उपांत्य फेरीचा सामना १५ नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाकडे न्यूझीलंडला पराभूत करून 2019 च्या विश्वचषक स्पर्धेचा बदला घेण्याची चांगली संधी चालून आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड ( IND vs NZ) या सेमिफायनल सामन्यात कर्णधार रोहित शर्माकडे एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी  असेल. कोणता आहे तो विक्रम जाणून घेऊया सविस्तर..

IND vs NZ Semifinal: पहिल्या सेमीफायनलवर पावसाचे सावट, पावसामुळे सामना नाही झाला तर कोणता संघ पोहचेल फायनलमध्ये, घ्या जाणून समीकरण..

भारत आणि न्यूझीलंड ( IND vs NZ)  रोहित शर्मा मोडू शकतो हा खास विक्रम .

भारतीय कर्णधार रोहित शर्माने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 9 सामन्यांत 55.88 च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यात 131 धावांची सर्वोत्तम खेळीही आहे.

रोहित शर्माने उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ५ धावा करताच अॅरॉन फिंचचा विक्रम मोडेल, ३७ धावा करताच तो रिकी पाँटिंगला मागे टाकेल, ४६ धावा करताच जयवर्धनेचा विक्रम मोडेल. 76 धावा केल्यावर तो एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.

अॅरॉन फिंचने 2019 मध्ये 507 धावा केल्या होत्या, रिकी पाँटिंगने 2007 मध्ये 539 धावा केल्या होत्या, महेला जयवर्धनेने 548 धावा केल्या होत्या आणि केन विल्यमसनने 2019 मध्ये 578 धावा केल्या होत्या. या सर्वांचा विक्रम मोडण्याची संधी आता भारतीय कर्णधार रोहित शर्माकडे आहे.

कर्णधार म्हणून खेळतांना विश्वचषकाच्या एका एडिशन मध्ये सर्वांत जास्त धावा करण्याचा विक्रम सध्या रोहित शर्माला खुणावत आहे. यासाठी त्याला केवळ सेमीफायनल मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 76+ धावा करण्याची गरज आहे. जरी न्यूझीलंडविरुद्ध रोहित एवढ्या धावा करू शकला नाही तरीदेखील न्यूझीलंडला पराभूत करने गरजेचे आहे.

कारण न्यूझीलंडला  पराभूत करतातच टीम इंडियाला आणखी एक सामना खेळण्याची संधी मिळेल, आणि उर्वरित धावा रोहित अंतिम सामन्यात काढून हा विक्रम आपल्या  नावे करू शकतो. आता रोहित शर्मा या दोन्ही सामन्यात कधी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

कधी आहे भारत वि न्यूझीलंड सेमीफायनल मुकाबला ?

IND vs NZ 1st Semifinal: पहिल्या सेमीफायनलमध्ये रोहित शर्माकडे विश्वविक्रम रचण्याची संधी, या 5 दिग्गज खेळाडूंचा विक्रम निशाण्यावर..

विश्वचषक 2023 चा पहिला सेमीफायनल सामना उद्या ( 15 नोव्हेबर ) ला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल तर जो संघ हा सामना हरेल त्याचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येणार आहे. टीम इंडियाने सर्व लीग सामने जिंकून विश्वचषक जिंकण्याचा प्रबल दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र असं असले तरीही न्यूझीलंडला देखील कमी लेखता येणार नाहीये. त्यामुळे हा सामना नक्कीच एक रोमाचांक सामना होणार, यात काही शंका नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *