IND vs SL Records: शतक हुकलं मात्र किंग कोहलीने जिंकली चाहत्यांची मने, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोडले हे 5 मोठे विक्रम..

IND vs NZ

ND vs SL: विश्वचषक 2023 चा 33वा सामना 2 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohali) श्रीलंकेविरुद्ध 88 धावांची खेळी खेळली आहे. कोहलीचे एकदिवसीय क्रिकेटमधील 49 वे शतक हुकले असले तरी, त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

आज चाहत्यांच्या नजरा कोहलीच्या शतकाकडे होत्या, ज्यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरची बरोबरी करू शकला असता.मात्र तसे झाले नाही कोहली 88 धावा काढून बाद झाला..

IND VS SL LIVE: विराट कोहलीचं 49 व शतक हुकलं, कोहली 88 धावा काढून बाद चाहत्यांमध्ये निराशा,पहा व्हिडीओ..

एकीकडे विराटचे शतक जरी हुकले असली तरीदेखील दुसरीकडे मात्र विराट कोहलीने या सामन्यात 5 मोठे विक्रम केले आहेत. कोहलीने कोणते 5 विक्रम केले तेच जाणून घेऊया या फिचरमधून..

IND vs SL Records :विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोडले हे 5मोठे विक्रम..

1.एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 हजार धावा पूर्ण

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली आशियातील सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे.

2.एका वर्षात सर्वाधिक वेळा एक हजारहून अधिक धावा

याशिवाय विराट कोहली एका वर्षात सर्वाधिक वेळा एक हजारहून अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने हा पराक्रम 8 वेळा केला आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने एका कॅलेंडर वर्षात 7 वेळा हजारहून अधिक धावा केल्या आहेत.

IND vs SL Records: शतक हुकलं मात्र किंग कोहलीने जिंकली चाहत्यांची मने, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोडले हे 5 मोठे विक्रम..

३.श्रीलंकेविरुद्ध 4 हजार धावा पूर्ण

याशिवाय विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरला आहे. हा देखील एक मोठा विक्रम आहे. आणि आता हा विक्रम टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे.

4.सलामीवीर नसतांना सर्वाधिक अर्धशतके.

त्याचबरोबर विराट कोहली विश्वचषकात सलामीवीरशिवाय सर्वाधिक अर्धशतकांची खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. कोहलीने या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनून पुढील विक्रम केला. हे सर्व विक्रम स्वतःमध्ये अगदी अनोखे आहेत, ज्यावरून हे दिसून येते की, कोहलीचे शतक हुकले असले तरीही त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *