Ram Mandir Pran Pratishta Invitation for Cricketers: राम मंदिर प्राणप्रतिष्टा सोहळ्यास जाणार टीम इंडियाचे हे 4 खेळाडू, स्वतः मंदिर समिती कडून मिळालेय निमंत्रण..!

0

 Ram Mandir Pran Pratishta Invitation for Cricketers: समस्त हिंदू बांधवांचा सर्वांत मोठा  उत्सव 22 जानेवारी रोजी आयोध्येमध्ये सुरु होणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीने देशवासियांना दिवाळी साजरी करण्याचं आव्हान केलं आहे. यावरूनच समजते की हा दिवस समस्त देशवासीयांसाठी किती महत्वाचा आहे.

अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबाबत देशभरात प्रचंड उत्साह आहे. या कार्यक्रमात देशातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होणार आहेत. क्रिकेट जगतातील अनेक बड्या स्टार्सनाही या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. चला तर जाणून घेऊया राम मंदिर प्राणप्रतिष्टा सोहळ्यासाठी कोणकोणत्या क्रिकेटखेळाडूंना निमंत्रण मिळाले आहे.

 Ram Mandir Pran Pratishta Invitation for Cricketers: राम मंदिर प्राणप्रतिष्टा सोहळ्यास जाऊ शकतात हे क्रिकेटर

सचिन तेंडुलकर: क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर हा या यादीमध्ये सर्वांत वर आहे. क्रिकेट क्षेत्रामध्येराम मंदिर ट्रस्टकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळणारा सचिन पहिला क्रिकेटर आहे. तो नक्कीच या भव्यदिव्य कार्यक्रमाला जाणार,असं म्हटलं जात आहे.

 विराट कोहली: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सुद्धा राम मंदिर प्राणप्रतिष्टा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना सोबत निमंत्रण देण्यात आले आहे.

MS Dhoni's Role Model: "मला नेहमीच त्यांच्यासारखा खेळाडू व्हायचं होत.." महेंद्रसिंग धोनीने पहिल्यांदाच सांगितल कोण आहे त्यांचा आदर्श, नेहमी या खेळाडूसारख व्हायचं होत..

महेंद्रसिंग धोनी : भारतासाठी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार  महेंद्रसिंग धोनी यांना देखील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

 हरभजन सिंग:  भारताचा महान फिरकीपटू हरभजन सिंग यांना देखील अभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी कोण अयोध्येला जाणार? याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

टीम इंडियाचा माजी कर्णधार सचिन,धोनी आणि कोहली अयोध्येला जाऊ शकतात असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

 Ram Mandir Pran Pratishta सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असतील.

22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आतापर्यंत सुमारे 6 हजार विशेष लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात क्रिकेटपटूंशिवाय चित्रपटातील व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपतींचा समावेश आहे. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील.

 Ram Mandir Pran Pratishta Invitation for Cricketers: राम मंदिर प्राणप्रतिष्टा सोहळ्यास जाणार टीम इंडियाचे हे 4 खेळाडू, स्वतः मंदिर समिती कडून मिळालेय निमंत्रण..!

आजपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

आजपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या दिमाखदार सोहळ्यासाठी संपूर्ण शहर नववधूप्रमाणे सजवण्यात येत आहे. 22 जानेवारी रोजी दुपारी 12.30 ते 1 या वेळेत अभिषेक सोहळा होणार आहे. या सोहळ्यात 150 देशांतील रामभक्त सहभागी होण्याची शक्यता आहे. 21 जानेवारी आणि 22 जानेवारीला मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर हे मंदिर 23 जानेवारीला रामललाच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in | All Rights Reserved.

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave A Reply

Your email address will not be published.