IND vs NZ: ‘आज माझाच विक्रम तोडलास’.. कोहलीच्या 50 व्या शतकानंतर सचिन तेंडूलकरने अभिनंदन करत केली खास पोस्ट, सोशल मिडीयावर होतेय तुफान व्हायरल..

IND vs NZ: तो दिवस अखेर 15 नोव्हेंबर रोजी आला, जेव्हा करोडो भारतीय चाहत्यांनी विराट कोहलीच्या 50व्या वनडे शतकाचे साक्षीदार होते. कोहलीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनल मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावून इतिहास रचला. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 49 वे शतक मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला.

आता अनेक क्रिकेट दिग्गज विराट कोहलीचे अभिनंदन करत आहेत. यात  सचिन तेंडुलकरचेही नाव आले होते. त्याने विराट कोहलीला त्याच्या जुन्या दिवसातील एक प्रसंग शेअर करत खास शुभेच्छा दिल्या.

कोहली

50 वे शतक ठोकताच सचिन तेंडूलकरने केली विराटसाठी खास पोस्ट.

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावण्यात विराट कोहलीला यश आले. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत त्याने हा पराक्रम केला. मात्र, अभिनंदन करण्यात सचिन तेंडुलकरही मागे राहिला नाही. त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून विराटबद्दल एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने जुने दिवस आठवताना कोहलीचे अभिनंदन केले. सचिन तेंडुलकरनेही आपल्या पोस्टमध्ये रन मशीनसोबत झालेल्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला आहे.

सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट ,

विराटचे अभिनंदन करताना सचिन तेंडुलकरने त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले

“जेव्हा मी तुला पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंगमध्ये भेटलो होतो. तेव्हा माझ्या पायाला हात लावल्याबद्दल काही टीममेट्सनी तुझी चेष्टा केली. त्यादिवशी मला माझे हसू आवरता आले नाही. पण लवकरच तू तुझ्या उत्कटतेने आणि तुझ्या तंत्राने माझ्या हृदयाला स्पर्श केलास. तो तरुण मुलगा विराट कोहली झाला याचा मला खूप आनंद आहे. विश्वचषकाच्या एवढ्या मोठ्या मंचावर एका भारतीयाने माझा विक्रम मोडला याचा मला तुझ्यापेक्षा जास्त आनंद होतोय. माझ्या घरच्या मैदानावर तुझे 50 वे शतक झळकावून तू केकवर आयसिंग लावलीस.”

'आज माझाच विक्रम तोडलास'.. कोहलीच्या 50 व्या शतकानंतर सचिन तेंडूलकरने अभिनंदन करत केली खास पोस्ट, सोशल मिडीयावर होतेय तुफान व्हायरल..

या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने 113 चेंडूत 117 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. यादरम्यान त्याने 103.54 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. मात्र, अखेरीस त्याला टीम साऊदीने आपला बळी बनवले. या सामन्यात विराट कोहलीशिवाय श्रेयस अय्यरनेही १०५ धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने चार गडी गमावून 397 धावा केल्या होत्या.


  • हेही वाचा:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *